Chandrapur dist@ news
• वनकामगारांच्या अन्नत्याग उपोषणाचा आज दुसरा दिवस !
चंद्रपूर :किरण घाटे
सुवर्ण भारत(संपादक)
गेल्या काही वर्षांपासून सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पुसद येथे रोजंदारीवर कार्यरत असणाऱ्या वनकामगारांना आता पावेतो सेवेत कायम न केल्यामुळे त्यांनी अन्नत्याग उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे .या संदर्भात त्यांनी शासन स्तरावर वारंवार पत्रव्यवहार केला पण त्यांना यश आले नाही. अखेर महाराष्ट्र राज्य रोजंदारी वनकामगार कृती समिती शाखा पुसदचे अध्यक्ष रमाशंकर राममनोहर शुक्ला उपाध्यक्ष बाबू मधव शेळके, सचिव प्रकाश मैनाजी खंदारे, वनकामगार वामन महादू इंगोले, सिताराम गोपाळ राठोड,मोहन रतन राठोड, उत्तम राठोड हे काल पासून तर हरीभाऊ विठ्ठलराव पुजारी हे आज पासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. आता उपोषणाला बसणा-यांची संख्या आठवर पोहचली आहे. अर्धे आयुष्य या विभागात (नोकरीत घालविणा-या ) वनकामगारांना आशा होती की आपणांस या सेवेत कायम करतील परंतु त्यांच्या आशेवर पाणी फेरले अखेर त्यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण करुन या रास्त मागणी कडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.