Chandrapur dist@ news
• वनविभाग शिवणीच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची सखोल चौकशी करा – दत्तात्रय समर्थ यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपूर: जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र वन विभाग प्रादेशिक शिवनी कार्यालयाच्या रोखलेल्या खर्च प्रमाणकेची एसटीआय द्वारा चौकशी करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलचे शहराध्यक्ष तथा सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे एका लेखी निवेदनातून केली आहे. समर्थ यांनी या तक्रारीची एक प्रत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे कडे सादर केली आहे.
उपरोक्त प्रकरणात सखोल व सविस्तरपणे चौकशी झाल्यास त्या विभागात झालेला गैरप्रकार उघडकीस येवू शकते असे शिवणीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांचे स्पष्ट म्हणणे आहे.
दरम्यान त्यांनी दोन दिवसांपूर्वी सिंदेवाही मुक्कामी एक पत्रकार परिषद घेवून पत्रकारांना या बाबतीत सविस्तर माहिती दिली आहे.


