Home Breaking News chandrapur dist @news • चंद्रपूरातील आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलन तर्फे सुरू...

chandrapur dist @news • चंद्रपूरातील आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलन तर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला अनेकांची भेट • कोळी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहणार-महेश देवकते

55

chandrapur dist @news
• चंद्रपूरातील आदिवासी कोळी जमातीच्या राज्यव्यापी महाआंदोलन तर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला अनेकांची भेट
• कोळी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहणार-महेश देवकते

चंद्रपूर :किरण घाटे

आदिवासीं कोळी जमातीचे राज्यव्यापी साखळी उपोषण गत 14 दिवसांपासून चंद्रपूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु आहे. सदरहु आंदोलनाला मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर ,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भेट देऊन चंद्रपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना सूचना केल्यानुसार काल शिष्टमंडळासह एक बैठक बोलावली होती. उपरोक्त बैठक विस कलमी सभागृहात पार पडली.

आयोजित या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी माने , नायब तहसिलदार विनोद डोनगांवकर जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश देवकते, आंदोलनाचे नेतृत्व करणारे ज्ञानोबा येलकेवाड, शिवाजी बोईनवाड,मारोती पुलेवाड,बालाजी येलेबोईनवाड, संबटवाड,आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विविध मागण्यांवर सविस्तरपणे चर्चा होऊन, प्रशासनाने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. आंदोलनकर्ते उपोषण मागे घ्यायचे की नाही यावर राज्य समितीला विचारून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आपण कोळी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशिल राहणार असल्याचे महेश देवकते यांनी या बैठकी नंतर या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .