Home Breaking News Gadchiroli dist @news • अहेरी येथे ‘एलेवन स्टार स्पोर्टिंग क्लब’ यांच्या तर्फे...

Gadchiroli dist @news • अहेरी येथे ‘एलेवन स्टार स्पोर्टिंग क्लब’ यांच्या तर्फे भव्य बॅडमिंटन स्पर्धा • माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे विजेत्या स्पर्धकांना विशेष बक्षीसे.

13

Gadchiroli dist @news
• अहेरी येथे ‘एलेवन स्टार स्पोर्टिंग क्लब’ यांच्या तर्फे भव्य बॅडमिंटन स्पर्धा

• माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे विजेत्या स्पर्धकांना विशेष बक्षीसे.

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

अहेरी :- विधानसभा क्षेत्रात विविध भागात नेहमीच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.आपल्या भागातील खेळाडू मधील सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील क्रीडा कौशल्या दाखवून आपल्या अहेरी विभागाचे नावलौकिक व्हावे,उत्कृष्ठ खेळाडूंना प्रोत्साहन मिळवा,क्रीडा क्षेत्रात उंच भरारी इथल्या स्पर्धकांनी घ्यावे या उदात्त हेतूने क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी अहेरी इस्टेट चे राजे,माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे नेहमी आपल्या क्षेत्रातील क्रीडा स्पर्धकांना सहकार्य करत असतात.

एलेवन स्टार स्पोर्टिंग क्लब अहेरी यांच्या सौजन्याने,कै.श्रीमंत राजे सत्यवनराव महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ,भव्य बॅडमिंटन स्पर्धा,जुने एस बी कॉलेज(नगर) अहेरी येथे आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी मोठ्या संख्येने बॅडमिंटन स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

डबल बॅडमिंटन स्पर्धा प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकाला ट्रॉफी व 15000/-(पंधरा हजार रुपये),द्वितीय क्रमांक विजेत्याला ट्रॉफी व 7000/-(सात हजार रुपये) व सिंगल बॅडमिंटन स्पर्धा प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकाला ट्रॉफी व 10000/-(दहा हजार रुपये),द्वितीय क्रमांक विजेत्याला ट्रॉफी व 5000/-(पांच हजार रुपये),अंडर 16 वर्षे डबल प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकाला ट्रॉफी व 2000/-(दोन हजार रुपये) द्वितीय क्रमांक विजेत्याला ट्रॉफी व 1000/- (एक हजार रुपये) अंडर 16 वर्षे सिंगल प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकाला ट्रॉफी व 2000/-(दोन हजार रुपये) द्वितीय क्रमांक विजेत्याला ट्रॉफी व 1000/-(एक हजार रुपये) हे सर्व विशेष बक्षिसे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम व युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम यांच्या तर्फ देण्यात आले.

बक्षीस वितरण कार्यक्रम स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला अहेरी भाजप तालुका अध्यक्ष संतोष मद्दीवार,माजी नगराध्यक्ष हर्षाताई ठाकरे,नगरसेवक अमोल गुडेल्लीवार तसेच तालुक्यातील भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते,बॅडमिंटन स्पर्धक व युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते..!