Home Breaking News Beed dist @news • कडा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लातूर...

Beed dist @news • कडा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लातूर संभाजीनगर धर्तीवर रस्ताच्या मध्यभागी बसवण्यात यावा अन्यथा • ३० जुलै पासून आष्टी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा: जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे

84

Beed dist @news
• कडा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा लातूर संभाजीनगर धर्तीवर रस्ताच्या मध्यभागी बसवण्यात यावा अन्यथा

• ३० जुलै पासून आष्टी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा: जिल्हा अध्यक्ष यशवंत खंडागळे

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील मौजे साबलखेड -कडा-आष्टी ते चिंचपूर या राज्य महामार्गाचे सध्या रस्त्याचे काम सुरु असून आमची अनेक दिवसांची मागाणी आहे की, कडा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा असलेला पुतळा रस्त्याच्या मध्यभागी घेण्यात यावा . या बाबत यापूर्वी देखील शासन, प्रशासनाकडे निवेदन दिलेले असुन, सध्या कडा येथे रस्ताचे काम सुरु असुन होणा-या रस्ताच्या मध्यभागी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात यावा , ही आम्हां समाज बांधवाची एकमुखी मागणी ही अनेक वर्षाची मागणी असून , या मागणीचा सहानुभुतीपुर्वक विचार करून पुतळा कडा येथील आंबेडकर चौकात लातुर/संभाजीनगर धर्तीवर मध्येभागी बसवण्या बाबत संबधीतांना योग्य ते आदेश द्यावेत ! नसता दि.३० जुलैपासुन आष्टी तहसिल कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा ईशारा , डाॕ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे बीड जिल्हाध्यक्ष यशवंत खंडागळे यांनी लेखी निवेदनाव्दारे आष्टीचे तहसिदार प्रमोद गायकवाड यांना दिला असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे .