Home Breaking News Chandrapur city@ news • २० वर्षांपासून सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम! •चंद्रपूरात...

Chandrapur city@ news • २० वर्षांपासून सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम! •चंद्रपूरात पार पडला अनेकांच्या उपस्थितीत २१ दिव्यांग जोडप्याचा विवाह ! •माजी खा.नरेशबाबू पुगलिया यांनी दिले वधूवरांना आशिर्वाद

307

Chandrapur city@ news
• २० वर्षांपासून सामुहिक विवाह सोहळ्याची परंपरा कायम!
•चंद्रपूरात पार पडला अनेकांच्या उपस्थितीत २१ दिव्यांग जोडप्याचा विवाह !
•माजी खा.नरेशबाबू पुगलिया यांनी दिले वधूवरांना आशिर्वाद

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

वरोरा येथील आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गत २० वर्षांपासून दिव्यांग बांधवाचा सामुहिक विवाह कार्यक्रम होत आहे. यावर्षी देखील दिव्यांग जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार दि.११ फेब्रुवारीला नागपूर रोडवरील गौरव सेलिब्रेशन येथे करण्यात आले होते. सदरहु कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रपूरचे माजी खा. नरेशबाबू पुगलिया यांनी विभुषित केले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वरोरा न.प.चे माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विनोद दत्तात्रय, निधी अर्बन बँक वणीचे अध्यक्ष संजय खांडे, जिल्हाध्यक्ष विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे ऍड. अविनाश ठावरी प्रामुख्याने उपस्थित होते.
आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टने सुरु केलेला दिव्यांग बांधवाचा विवाह सोहळा हे फार छान काम आहे. या कार्यक्रमाला माझा पण हातभार लाभावा म्हणून दरवर्षी मला ते या कार्यक्रमात सहभागी करून घेतात. संस्थेने फक्त २१ जोडप्यांच्या विवाहांवर न थांबता हि संख्या वाढवावी या साठी सातत्याने प्रयत्न करावे. त्या साठी सर्वोतोपरी माझ्याकडून मदत दिली जाईल अशी ग्वाही माजी खा. नरेशबाबू पुगलिया यांनी या वेळी बोलताना आपल्या भाषणातून दिली. आज पार पडलेल्या विवाह सोहळ्यातील सर्व नवोदित जोडप्यांना त्यांनी आशिर्वाद दिला. दरम्यान याच कार्यक्रमाच्या निमित्ताने एका रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दिव्यांग जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा यशस्वी करण्याकरिता नरेंद्र (श्यामबाबू) पुगलिया, नगिना पुगलिया, अरुण बाफना, गुंजन बाफना, निर्दोषकुमार पुगलिया, प्रभा पुगलिया, उल्लासकुमार पुगलिया, अरुण पुगलिया, विजयकुमारजी पुगलिया, राहुल पुगलिया, धीरज पुगलिया, सुभाष शिंदे, संजय पेचे, अतिष अक्केवार, महेश भगत, विनोद भोयर, अशोक कोठारी, यशवंत देशमाने, सुहास देवडे, महेश मॅकलवार, गौरव फाउंडेशन, जय बजरंग क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ, बाबूपेठ, रक्तदान महादान निवार्थ सेवा फाउंडेशन चंद्रपूर, विप्लोप ज्वेलर,चंद्रपूर यांनी मोलाचे योगदान दिले..