-⏹️ गुलाबी थंडी⏹️ –
🔸🌼🔸वैशाली राऊत सहज सुचलं सदस्य नागपूर.
येता गुलाबी हवा
👇किरण घाटे
सुवर्ण भारत: सहसंपादक
आला अंगावर शहारा,
मिळाला गुलाबी थंडीचा
हळूच सर्वांगी इशारा.(१)
आठवणीचा पिसारा
रंगला हळूच मनात,
आले गालात हसू
शहारा कणा कणात.(२)
पहाट धुक्यांची ही
देई हळूच चाहूल,
आली गुलाबी थंडी
उठे मनात काहूर.(३)
झोंबतो गार वारा
देतो मनास स्वानंद,
मोहरते प्रितीचे पाखरू
मिळते मिलनाचा आनंद.(४)
हेमंताच्या आगमनाने
फुलतो अंगावर काटा,
गुलाबी थंडीत उठते
मनी प्रितीच्या लाटा.(५)
मिठीत तुझ्या फुलतो
अंकुर माझ्या प्रेमाचा,
रोमांचित करून जातो
इशारा गुलाबी थंडीचा.(६)
चहाचा आस्वाद घेऊ
शेकोटीच्या संग,
हुडहूडत्या थंडीत
भासे सुखद प्रसंग.(७)