Home Breaking News Ghugus city @news • लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि लॉयड्स इनफीनाईट फाउंडेशन...

Ghugus city @news • लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि लॉयड्स इनफीनाईट फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम • घुगुसात बाल कला महोत्सवाचा जल्लोष

28

Ghugus city @news
• लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि लॉयड्स इनफीनाईट फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम
• घुगुसात बाल कला महोत्सवाचा जल्लोष

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत: सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि लॉयड्स इनफीनाईट फाऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्या मध्ये चालणाऱ्या
आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत प्रियंदर्शनी कन्या विद्यालय, घुग्घुस येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी दिनांक ७ व ८ फेब्रुवारी २०२४ ला २ दिवसीय बालकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
या बालकला महोत्सव प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर अडबाले (विधानपरिषद सदस्य),शालिनी मुनघाटे (संस्थापिका प्रियदर्शनी कन्या विद्यालय), नम्रपाली गोंडाने (लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन, सीएस आर हेड), मुकेश भोयर(समन्वयक, लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट) ब्रिजभूषण पाझारे (अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना), गीता चौधरी (विस्तार अधिकारी), अनिल दागमवार(केंद्रप्रमुख घुग्घुस), फाल्गुन खामणकर (पर्यवेक्षक प्रियदर्शिनी कन्या विद्यालया घुग्घुस) हे उपस्थित होते. सदर बालकला महोत्सवात रनिंग रेस, स्मरणशक्ती स्पर्धा, गितगायन, वकृत्व स्पर्धा, एकल नृत्य, समूह नृत्य व अनेक शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. उपक्रमात विद्यार्थ्यांचा व पालकांचा तसेच ग्रामस्थांचा उस्फुर्त सहभाग होता. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी संस्थेच्या वतीने बालकला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विखार सर व सातरदे सर यांनी केले तर आभार मत्ते सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षकवृंद, स्टूडेंट ॲक्शन फोरम चे विद्यार्थी व लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट चे सह. समन्वयक रश्मि होले, पायल राजपूत सुमैया मिर्झा ,मिलिंद काटकर, प्रज्ञा पवार, शिवानी नागपुरे, अश्विनी नलभोगा यांनी कठोर परिश्रम घेतले.