Home Breaking News Ghugus city @news • महाकाली नगरी गणेश कमिटीतर्फे गणेश जयंती महोत्सव

Ghugus city @news • महाकाली नगरी गणेश कमिटीतर्फे गणेश जयंती महोत्सव

102

Ghugus city @news
• महाकाली नगरी गणेश कमिटीतर्फे गणेश जयंती महोत्सव

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत: सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर

घुग्घुस येथुन अंदाजे २किलोमीटर अंतरावर म्हातारदेवी परिसरातील महाकाली नगरी येथे दि.१३ फेब्रुवार २०२४ मंगळवार सकाळी १०वाजता अभिषेक, १ वाजता भजन, ३ वाजता रांगोळी स्पर्धा व सांयकाळी लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस व तसेच जेष्ठ नागरिक व जेष्ठ महिलाचा सत्कार करण्यात आले.तसेच सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले.तसेच महाप्रसाचे आयोजन करण्यात आले.

तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी सभापती बिज्रभुषण पाझारे,दत्तात्रेय भोयर,मेघराज मोहितकर,सैनिक आतीष झाडे, माजी बालकल्याण सभापती नितु चौधरी,प्रयास सखी मंच घुग्घुसचे अध्यक्षा किरण बोढे, पद्मशाली समाज उपाध्यक्ष वंदना मुळेवार मंचावर उपस्थित होते,यांच्या हस्ते स्पर्धेत भाग घेतलेले प्रथम बक्षिस सोनु वैद्य तसेच जेष्ठ नागरिकांनच्या सत्कार करण्यात आले.

याप्रसंगी महाकाली नगरी गणेश मंदिर कमेटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम वडस्कर, उपाध्यक्ष अमोल खिरटकर, सचिव संदीप चांबारे, कोषाध्यक्ष प्रमोद उपाध्य, सुभाष तातावार,महिला कमेटी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.