Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुर अपंग कल्याण बहुउद्देश्यीय संस्था तर्फे बल्लारपुर नगरपालिका...

Ballarpur city@ news • बल्लारपुर अपंग कल्याण बहुउद्देश्यीय संस्था तर्फे बल्लारपुर नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन • ५% दिव्यांग निधि त्वरित देण्याची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा

143

Ballarpur city@ news
• बल्लारपुर अपंग कल्याण बहुउद्देश्यीय संस्था तर्फे बल्लारपुर नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन

• ५% दिव्यांग निधि त्वरित देण्याची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा

✍️ शंकर महाकाली
सुवर्ण भारत: संपादक

बल्लारपूर : अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजकुमार रामटेके यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते आसिफ हुसेन शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ फेब्रुवारी रोजी बल्लारपूरच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व त्यात विविध मागण्या करण्यात आल्या.

केंद्र सरकारच्या योजना मध्ये अपंग व्यक्ती अधिनियम १९१६, अपंग व्यक्तींचा अधिकार अधिनियम, २०१६ कायदा आणि नियम ३७ नुसार विविध योजनांमध्ये ५% निधी अपंग व्यक्तींसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बल्लारपूर नगरपरिषदेच्या माध्यमातून २०१८ मध्ये अपंगांना ३% निधी वितरीत करण्यात आला. १००% दिव्यांग व्यक्तींना २५ हजार रुपये, ८०% दिव्यांग व्यक्तींना २० हजार रुपये, १५ हजार रुपये ६० % दिव्यांग व्यक्तींना, ११ हजार रुपये ४०% दिव्यांग व्यक्तींना वाटण्यात आले, त्यानंतर केवळ ३४५ अपंग व्यक्तीलाच लाभ मिळाला.

अपंग व्यक्ती अधिनियम, १९१६ मध्ये काही बदल केल्यानंतर केंद्र सरकारची योजना ३% वरून ५% पर्यंत वाढवण्यात आली.

त्यानुसार २०१८ मध्ये नगरपरिषद बल्लारपूरने वाटप केलेल्या रकमेनुसार २०१९ मध्ये अधिक रक्कम वाढवायला हवी होती मात्र उलट ही रक्कम कमी करण्यात आली आहे. नगरपरिषद बल्लारपूर मार्फत सन २०१९ पासून देण्यात येत असलेल्या निधीचे वाटप अत्यल्प प्रमाणात होत आहे.

२०१९-२० मध्ये १००% दिव्यांग व्यक्तींना ६ हजार ८०० रुपये शहर आणि ५०० रुपये ची धान्य किट देण्यात आले. तेव्हा लाभार्थी अपंगांची संख्या ७५० होती. सन २०२१ -२२ मध्ये १००% दिव्यांग व्यक्तींना ६ हजार ६०० रुपये, सन २०२२-२३ मध्ये ४ हजार २०० रुपये देण्यात आले. सन २०२३ पर्यंत नगरपरिषदेत अपंगांच्या प्राप्त अर्जानुसार दिव्यांगांची संख्या ७२५ असूनही ५% अपंग निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे.

अशा अपंगांना ते जाणवत आहे. एवढ्या पैशातून एकही अपंग भाऊ किंवा बहीण आपला व्यवसाय करू शकत नाही. आणि हा निधी मार्च महिन्यापर्यंत वितरीत व्हायला हवा मात्र हा निधी वाटण्यात बराच विलंब होत आहे. त्यामुळे शहरातील दिव्यांग बंधू- भगिनींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

या सर्व समस्यांची लवकरात लवकर दखल घेऊन अपंगांना त्यांची व्यावसायिक प्रगती बळकट करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने अपंगत्व निधीचे वितरण करण्यात यावे. कोणत्याही दिव्यांग व्यक्तीवर अन्याय होता कामा नये. या वर्षीचा निधी दिव्यांगांशी चर्चा करून १५ दिवसांत वितरित करण्यात यावा, अन्यथा अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.

या वेळी निवेदन देताना विकास भगत, सुरेश केसकर, सुभाष जोळागंडे, संजय मेश्राम, राजेश सुरमवार, भास्कर मंथनवार, रूपा राठोड, कांचन इटनकर, वनिता सोनुर्ले सह आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते