Home Breaking News Ghugus city @news • चंद्रपूर जिल्हा भाजपाच्या महामंत्री पदावर विवेक बोढे यांनी...

Ghugus city @news • चंद्रपूर जिल्हा भाजपाच्या महामंत्री पदावर विवेक बोढे यांनी नियुक्ति जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा केली कार्यकारिणी जाहिर

96

Ghugus city @news
• चंद्रपूर जिल्हा भाजपाच्या महामंत्री पदावर विवेक बोढे यांनी नियुक्ति जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा केली कार्यकारिणी जाहिर

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस : भाजपा चंद्रपूर जिल्हा महामंत्री पदावर घुग्घुस येथील विवेक बोढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रपूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांची नावे जाहीर केली आहे.

घुग्घुस शहरात ना. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राची भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात विवेक बोढे यांनी स्थापना केली. अभिनव कार्यशैली मुळे अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या सेवा केंद्रातून 30 हजारांच्या वर लाभार्थ्यांना निःशुल्क लाभ मिळवून दिला आहे.
भाजपाचे घुग्घुस शहराध्यक्ष पासून ते भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष या पदावर विवेक बोढे यांनी यशस्वीरित्या कार्यकाळ पूर्ण केला आहे.

ना. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून आणि भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी अनेक सेवाकार्य केली आहेत. गरजूंना विश्वकर्मा योजनेचा लाभ, आयुष्यमान कार्ड काढून देणे, एक रुपयात पिक विमा काढून देणे, महाज्योती फ्री टॅब योजना विद्यार्थ्यांसाठी राबवणे, प्रधानमंत्री स्वनिधी योजना अशा विविध शासकीय योजनांचा शेकडो लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला. लाभार्थ्यांना विविध शासकीय प्रमाणपत्राचे नि:शुल्क वितरण, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले मोफत काढून देणे, दिव्यांग बांधवांना मदत. महिलांना बचतीसाठी प्रयास अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना, जिल्हाभर श्री. देवराव भोंगळे यांच्या वाढदवसानिमित्त महारक्तदान शिबीर घेऊन विक्रमी 3026 दात्यांचे रक्तदान, प्रत्येक महिन्याला शस्त्रक्रियेसाठी नेत्ररुग्णांच्या व विविध आजारांच्या उपचारासाठी तुकडी रवाना, वेकोलिचा लोखंडी पुल दुचाकीच्या रहदारीकरिता सुरु, नकोडा-मुंगोली प्रतिबंधित पुल दुचाकीच्या वाहतुकीसाठी सुरु, सेवानिवृत्त सैनिकांचे निवास करमुक्त करणे, वेकोलि, एसीसी, लॉयड्स मेटल्स, नपच्या वतीने शहरात मोफत पाणी पुरवठा सुरु, सेवा केंद्रतर्फे टँकरने मोफत पाणी पुरवठा करणे, अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांना सहा महिन्याचे घरभाडे तसेच शासकीय भूखंड घरे बांधण्यासाठी उपलब्ध करून देणे, आनंदाचा शिधा वाटप, लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप, शहरात हायमास्ट लाईट, रस्त्याचे सिमेंटीकरण, इलेक्ट्रिक केबल टाकणे, अत्याधुनिक रुग्णवाहीका व शववाहिका उपलब्ध करून देणे, छोटया दुकानदारांना छत्री वाटप, गरजू लोकांना रक्तपुरवठा उपलब्ध करणे अशी अनेक कामे सातत्याने केली जात आहेत.

त्यामुळे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे हे अल्पावधित युवकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले. अपघात घडल्यास तत्काळ मदतीसाठी धावून जाणे, कर्करोगग्रस्तांना, अनाथ व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे अशी कार्यशैली त्यांची आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे आतापर्यंत अनेकांना जीवनदान मिळाले आहे.

जिल्हा भाजपच्या सरचिटणीस पदावर विवेक बोढे यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.