Home Breaking News Ballarpur city @news • बल्लारपुर शहरात वावरण्या बिबटची बंदोबस्त करण्याची वंचित बहुजन...

Ballarpur city @news • बल्लारपुर शहरात वावरण्या बिबटची बंदोबस्त करण्याची वंचित बहुजन युवा आघाडी यांची मागणी

162

Ballarpur city @news
• बल्लारपुर शहरात वावरण्या बिबटची बंदोबस्त करण्याची वंचित बहुजन युवा आघाडी यांची मागणी

✍️पारिश मेश्राम
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपूर : चूनाभट्टी परिसर पेपर मिल न्यू कॉलनी परिसरात वावरण्या बिबट्याची बंदोबस्त करण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडी ने केले आहे.

बल्लारपूर पेपर मिलच्या स्लज गार्डन परिसरात तसेच पेपर मिल बांबू डेपो व चंद्रपूर ते बल्लारशा मुख्य मार्गावर बिबट्या वावरत आहे. त्यामुळे तिथून येणारे पेपर मिल कर्मचारी तसेच शाळेकरी मुले व चंद्रपूरला कामाकरिता जाणा येणारे व्यक्तींना भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यामुळे कधी कोणत्या वेळेला व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता होऊ शकते. म्हणून वन अधिकारी नरेश भोवरे यांना निवेदन देण्यात आले. वन विभागाने या वन प्राण्यांचे लवकरात लवकर पिंजरा लावून जेरबंद कण्याची मागणी केली आहे.

यावेळी बल्लारपुर युवा तालुका अध्यक्ष अभिलाष चूनारकर, युवा आघाडी सम्यक रामटेके,राहुल वाळके, सरोज झाडे, सुहास दुबे, सोहन वनकर, प्रज्योत करमणकर, अंकित अहिरवार,अंशू पाटील, आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते