Home Breaking News •आयटकने दिले मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना निवेदन: शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात...

•आयटकने दिले मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना निवेदन: शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची केली मागणी ! • मागणीची पूर्तता न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन करु- कॉ. विनोद झोडगेंचा शासनाला इशारा!

1214

•आयटकने दिले मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना निवेदन: शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची केली मागणी !
• मागणीची पूर्तता न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन करु- कॉ. विनोद झोडगेंचा शासनाला इशारा!

ब्रम्हपूरी- किरण घाटे

महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आयटक राज्य कमिटीच्या वतीने नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शिक्षण मंत्री दीपक केसरकर या शिवाय शालेय शिक्षण अप्पर सचिव प्रमोद पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.दीड हजार रुपये वाढीचा जीआर शासनाचे वतीने तातडीने निघावा म्हणून आयटकचे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात सदरहु निवेदन सादर करण्यात आले.दरम्यान
आयटकच्या नेतृत्वात दि. 18 डिसेंबर 2023 रोजी नागपूर हिवाळी अधिवेशना वर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा महामोर्चा काढण्यात आला होता .त्यात लाखोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते.तेव्हा संघटनेला मोर्चाच्या अनुषंगाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पुढील सत्रामध्ये म्हणजे एक एप्रिल 2024 पासून सध्या मिळत असलेल्या मानधनांत दीड हजार रुपये वाढ करण्यात येईल .तसेच शालेय शिक्षण मंत्री,प्रधान सचिव व संघटनेची बैठक घेऊन मानधन वाढ प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवून येणाऱ्या बजेट मध्ये तरतूद करू असे आश्वासन दिले होते .परंतु त्याची पूर्तता न झाल्याने परत शालेय पोषण आहार कर्मचारी राज्य कमिटीच्या वतीने त्यांना स्मरण पत्र देण्यात आले आहे व प्रत्यक्ष मुख्यमंत्री ,शिक्षण मंत्री व शालेय शिक्षण अप्पर सचिव यांच्या सोबत चर्चा देखील झाली.
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ विचाराधीन आहेत व त्याबाबत जरूर तो योग्य निर्णय घेतला जाईल असे शिष्टमंडळाला या वेळी सांगण्यात आले.
शिष्टमंडळात आयटक संलग्न शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने राज्य महासचिव कॉ.विनोद झोडगे ,राज्य अध्यक्ष कॉ.श्याम काळे,राज्य उपाध्यक्ष कॉ.मुगा बुरुड,राज्य कार्याध्यक्ष भगवान पाटील,कॉ.राधा पांचाळ,श्रीकांत सुपरणीस आदिं मंडळी उपस्थित होती.त्यांनी चर्चा करून तात्काळ जीआर काढण्याची मागणी केली आहे . मागणीची पूर्तता न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन मुंबई आझाद मैदानावर छेडण्यात येईल असा इशारा कॉ.विनोद झोडगे यांनी दिला आहे.