Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुरात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

Ballarpur city@ news • बल्लारपुरात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

117

Ballarpur city@ news
• बल्लारपुरात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

बल्लारपुर:महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई द्वारा निर्देशित तालुका विधी सेवा समिती बल्लारपूर तथा तालुका अधिवक्ता संघ बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर( कार्यशाळा) दिनांक: 18/02/ 2024 रोजी नाट्यगृह सभागृह येथे पार पडले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनुपम शर्मा न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय (कनिष्ठ स्तर) बल्लारपूर तर प्रमुख पाहुणे विशाल वाघ मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, ओंकार ठाकरे तहसीलदार बल्लारपूर , धनंजय साळवे गट विकास अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर, शरद बोरीकर गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर, आसिफरजा शेख पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बल्लारपूर, राजूरकर मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन बल्लारपूर, इरपाते सहायक पोलीस निरीक्षक दामिनी पथक चंद्रपूर,अली मेजर सायबर सेल चंद्रपूर,एडवोकेट मेघा भाले, बल्लारपूर, डॉ. चौधरी मॅडम मानसिक रोग तज्ञ चंद्रपूर, नैताम मॅडम पोलीस उपनिरीक्षक बल्लारपूर, मेश्राम बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर तसेच प्रमुख उपस्थिती एडवोकेट सय्यद (अध्यक्ष) तसेच एडवोकेट बोराडे ( सचिव) यांची होती.

मंचावर उपस्थित मान्यवर राजूरकर मॅडम, शरद बोरीकर, अली, इरपाते, चौधरी मॅडम, धनंजय साळवे, मेश्राम यांनी पाक्सो कायद्याबाबत व सायबर गुन्ह्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण करताना अनुपम शर्मा न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय (कनिष्ठ स्तर ) बल्लारपूर यांनी सांगितले की, समाजामधील गैरसमज दूर व्हावे यासाठी पाक्सो या कायद्याची आणि नॅशनल चिल्ड्रन प्रोटेक्शन पॉलिसी अनुसार पॉस्को समिती बल्लारपूर तालुक्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात बनवण्यात येऊन त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती केली.

कार्यशाळेचे संचालन एडवोकेट नाजिम खान तसेच आभार प्रदर्शन एडवोकेट आय. आर. सय्यद (अध्यक्ष) यांनी केले.
या कार्यशाळेला बल्लारपूर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल बस चालक-मालक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.