Home Breaking News Ballarpur city@ news • बल्लारपुर वन विभागाने जखमी बिबट पकडला ; वैद्यकीय...

Ballarpur city@ news • बल्लारपुर वन विभागाने जखमी बिबट पकडला ; वैद्यकीय उपचारासाठी केला तो रवाना!

128

Ballarpur city@ news
• बल्लारपुर वन विभागाने जखमी बिबट पकडला ; वैद्यकीय उपचारासाठी केला तो रवाना!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

बल्हारपुर – विसापुर मार्गावर व पेपर मील परिसरात गेल्या काही दिवसांपासून फिरत असलेल्या एका बिबटला काल दुपारी वनविभाग पथकाने जेरबंद केले.तो बिबट जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले.नाल्याशेजारी बसुन असल्याबाबतची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे.) नरेश भोवरे यांना प्राप्त झाली. माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) हे आपले अधिनस्त वनकर्मचारी यांचे सोबत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक पहाणी केली असता सदरहु वन्यप्राणी जखमी असल्याचे दिसुन आले.त्यानंतर त्या बिबटास मोठ्या शिताफीने पकडण्यात आले या वन्यप्राण्याची तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी कुंदन पोडचलवार यांनी केली. बिबट हा नर असुन त्याचे वय अंदाजे 3 वर्षे इतके होते. तो जखमी असल्याने त्याला पुढील उपचारा करीता वन्यजीव उपचार केन्द्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले. त्याचेवर पशुवैद्यकीय अधिकारी हे उपचार करीत आहे.

उपवनसंरक्षक,मध्य चांदा वनविभाग,चंद्रपुर श्वेता बोड्डू यांचे मार्गदर्शनात आदेशकुमार शेंडगे, सहाय्यक वनसंरक्षक यांचे उपस्थितीत सदरहू मोहीम यशस्वी करण्यात आली या वेळी वनविभागाचे नरेश भोवरे,के.एन.घुगलोत, वनरक्षक कु. वर्षा पिपरे, कु.उषा घोडवे, एस.एम.बोकडे,आर. एस. दुर्योधन या शिवाय अति शिघ्र दल, चंद्रपुर येथील कर्मचारी उपस्थित होते.