Home Breaking News Chandrapur city @news • बिनबा गेट इरई नदीपात्रातून अवैध रेती तस्करी जोमात...

Chandrapur city @news • बिनबा गेट इरई नदीपात्रातून अवैध रेती तस्करी जोमात प्रशासन मात्र कोमात ?

73

Chandrapur city @news
• बिनबा गेट इरई नदीपात्रातून अवैध रेती तस्करी जोमात प्रशासन मात्र कोमात ?

✍️संजय तिवारी
सुवर्ण भारत:प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर :- चंद्रपूर येथील बिनबा गेट या परिसरातील असलेली इरई नदीचा पात्रातून मोठ्या प्रमानात अवैध रेती तस्करांनी इरई नदीत धुडगूस घातला असून दररोज मोठ्या प्रमानात रेतीची चोरटी वाहतूक करण्यात येत आहे. रेती तस्करांचा गोरखधंदा रात्रीच्या अधांरात सुरू आहे. चोराळा मार्ग मार्डा, देवाळा , पिपरी, या मार्ग अवैध रेतीची तस्करी सुरू केल्या जात आहे. या अवैध रेती तस्करी मुळे नदी पात्रात मोठमोठे खडे जेसीपी लावून खोदण्यात येत आहे. रेतीच्या चोराठ्या वाहतूकीकरिता तस्करांनी नदीपात्रात रस्ता तयार केला आहे. सदर रेती तस्करी रात्रीच्या अंधारात सुरू असून रेती तस्करी जोमात प्रशान मात्र कोमात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रेती तस्करांच्या ट्रॅक्टरने रात्रीचा सुमारास एका नागरिकास धडक देत तेतून पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

इरई नदी पात्रातून दररोज मोठ्या प्रमाणत रेतीची अवैध उपसा होत असते प्रशासन या कडे दुर्लक्ष का करत आहे. असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे. मात्र बिनबा गेट ते चोराळा मार्गावर चंद्रपूर पोलीस प्रशासना व तहसील प्रशासनाने या भागात आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांची ग्रस्त लावावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे रात्रच्या सुमारास होणारी अवैध रेती तस्करीवर आळा बसण्याकरिता प्रशासनाने या अवैध तस्कराविरोधात आपली धडक मोहीम प्रभावी करावी अशी मागणी या या भागातील नागरिकांकडून होत आहे.