Home Breaking News Ghugus city@ news • भारतीय बौद्ध महासभा घुग्घुस तर्फे राजे छत्रपती शिवाजी...

Ghugus city@ news • भारतीय बौद्ध महासभा घुग्घुस तर्फे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

149

Ghugus city@ news
• भारतीय बौद्ध महासभा घुग्घुस तर्फे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

✍️संजय तिवारी
सुवर्ण भारत:प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस – येथील भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस, व यशोधरा महिला मंडळ घुग्घुस, चा अनुषंगाने आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाऊ यांच्या शिकवणी प्रमाणे शिक्षण दिले व त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. व सर्व समाजातील लोकांना एकत्रित करून त्यांना मावळे असे असे म्हणुन संबधोत केले अशा या महामानवांचे विचार घरो घरी गेले पाहिजे.
असे मनोगत भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव, हेमंत आनंदराव पाझारे विहार बांधकाम कोषाध्यक्ष, संभाजी पाटील सल्लागार, यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर तर आभार प्रदर्शन शिल्पाताई सोंडुले यांनी केले.

यावेळेस भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुस कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे विजय कवाडे, श्याम कुम्मरवार, पंचफुलाताई पाटील, शोभाबाई पाईकराव, व समस्त भारतीय बौद्ध महासभा घुग्घुस, व यशोधरा महिला मंडळ घुग्घुस चे पदाधिकारी उपस्थित होते