Home Breaking News Chimur taluka@ news • रास्त मागण्यांसाठी युवा नेता अशिद मेश्राम यांचे काग...

Chimur taluka@ news • रास्त मागण्यांसाठी युवा नेता अशिद मेश्राम यांचे काग मध्ये लाक्षणिक उपोषण प्रारंभ

115

Chimur taluka@ news
• रास्त मागण्यांसाठी युवा नेता अशिद मेश्राम यांचे काग मध्ये लाक्षणिक उपोषण प्रारंभ

किरण घाटे: चंद्रपूर

चिमूर: तालूक्यातील काग येथील युवा नेता तथा रोखठोक प्रहार कामगार संघटनेचा चिमूर तालूका प्रमुख आशिद मेश्राम यांनी काग मुक्कामी आज सोमवार दि. १९फेब्रूवारी पासून लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे.दरम्यान मेश्राम यांनी या अगोदर गांव पातळीवरील काही आवश्यक व रास्त मागण्या सुटाव्यात व त्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी संबंधित विभाग प्रमुखांना लेखी निवेदने सादर केली होती. परंतु त्यांच्या निवेदनातील मागण्यांची आज पर्यंत कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी शेवटी गावातच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला.इतकेच नाही तर त्यांनी उपोषण सुरू करण्या अगोदर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा व पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचे कडे दोन आठवड्यापूर्विच लेखी निवेदन सादर केले होते.

अश्या आहे अशिद मेश्राम यांच्या प्रमुख मागण्या
१) प्र.क्र.१० मौजा काग येथे स्मशानभूमीचे शेड व स्मशानभूमीकडे येण्याजाण्याचा रस्ता उपलब्ध करून द्यावा
२) पंतप्रधान घरकुल आवास योजनेची उर्वरित दोन टप्प्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी
३) नाल्यांचा गाळ उपसून किटकनाशकाची फवारणी करावी
४) अजाबराव नैताम, सुरेश परचाके, यांच्या घरासमोरील नालीच्या दूषित पाण्याचा मार्ग बंद पडल्याने नवीन पुलियाचे बांधकाम करावे
५) प्र.क्र.१० काग येथे नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या विद्युत पोलची तारयंत्रणा पूर्णतः खाली झुकलेली असून विद्युत तार व्यवस्थीत करणे
६) महादेव भोपे, अरूण वाभिटकार , पुरूषोत्तम मत्ते, यांच्या घरासमोर दुषित पाण्याची गंगा वाहत असते यासाठी नवीन नालीचे बांधकाम तातडीने करणे.
७) चिमूर येथे दर शुक्रवारला आठवडी भरतो या बाजारातून जड वाहन ये जा करतात यावर प्रशासनाने बंदी घालावी.
८) प्र.क्र.१० मौजा काग येथे पाणी पिण्याच्या नवीन टाकीचे बांधकाम सुरू करण्यात यावे.
९) प्र.क्र.१० काग येथील बालाजी राणे, अंबादास मेश्राम, हरिदास गुळधे, यांच्या घरासमोर विद्युत पोल उभे करून लाईटची व्यवस्था करण्यात यावी.
१०) प्र.क्र.१० मधील आबादी प्लाॅट व नवीन वस्तीतील नालीचे बांधकाम सुरू करावे
११) उमा नदी पात्रातील कोल्हापूरी बंधारा फुटल्याने येजा करण्यासाठी गावकऱ्यांना बराच त्रास होत असून तिथे संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू करावे .आदिं त्यांच्या मागण्या असून प्रशासनाने या मागण्यांची अद्याप दखल घेतली नाही.अशिद मेश्राम यांच्या या उपोषणाला अनेकांनी आपले समर्थन जाहीर केले आहे.वास्तविक पाहता त्यांच्या सर्व मागण्या रास्त असल्याचे गावकरी मंडळीत बोलल्या जाते.