Home Breaking News chimur taluka @news •माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेसचे नेते विलास...

chimur taluka @news •माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेसचे नेते विलास डांगे याचा भाजपात प्रवेश! •आ.कीर्तीकुमार भांगडीयांनी केले डांगे यांचे स्वागत!

189

chimur taluka @news
•माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेसचे नेते विलास डांगे याचा भाजपात प्रवेश!

•आ.कीर्तीकुमार भांगडीयांनी केले डांगे यांचे स्वागत!

चंद्रपूर :किरण घाटे

चिमूर :तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास डांगे यांनी काल भाजप पक्षात प्रवेश केला.देशाचे पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदी व विकासाचा ध्यास असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तदवतचं आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांच्या कार्यक्षम, कणखर, कार्यकुशल नेतृत्वावर प्रभावित होऊन डांगे यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आहे.यावेळी आमदार कीर्तीकुमार भांगडीया यांनी त्यांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत केले
पक्षप्रवेशाप्रसंगी प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष राजू झाडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते भिमराव ठावरी, गिरीश भोपे, घनश्याम डुकरे, रमेश कंचर्लावार, भाजपा युवा नेते समीर राचलवार, सं.गां.नि.अ.यो. समितीचे अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा नेते योगेश नाकाडे, विलास कोराम, भाजयुमो शहर महामंत्री श्रेयश लाखे, सागर भागवतकर व अन्य भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.