Home Breaking News Rajura taluka @news • विविध मागण्यांसाठी महा मिनरल्स कंपनीवर राजुरा शिवसेना (...

Rajura taluka @news • विविध मागण्यांसाठी महा मिनरल्स कंपनीवर राजुरा शिवसेना ( उबाठा ) चा भव्य मोर्चा • बेरोजगारांना काम देण्याची मागणी

111

Rajura taluka @news
• विविध मागण्यांसाठी महा मिनरल्स कंपनीवर राजुरा शिवसेना ( उबाठा ) चा भव्य मोर्चा
• बेरोजगारांना काम देण्याची मागणी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

राजुरा:स्थानिक बेरोजगारांना रोजगारात समाविष्ट करावे, गोवरी ग्रामपंचायतचा थकीत कर भरणा करावा, परिसरातील शेतातील होणाऱ्या नुकसानीचा मोबदला द्यावा यासह विविध मागण्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राजुरा आणि हिंद मजदूर सभा या वेकोलिच्या कामगार संघटनेच्या बल्लारपूर क्षेत्राच्या वतीने भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना ( उबाठा ) जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या भव्य मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले.
यावेळी महा मिनरल कंपनीच्या अधिका-यांसोबत झालेल्या चर्चेत व्यवस्थापनाने सर्व मागण्यासाठी सकारात्मकता दर्शवित या महिन्यात ग्रामपंचायत गोवरीचा कर भरून स्थानिकांना रोजगारात समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले. बबनभाऊ उरकुडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चाला नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. यावेळी बोलतांना बबन उरकुडे यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढाकार सदैव सेवेसाठी तत्पर राहणार असल्याची ग्वाही दिली.
याप्रसंगी शिवसेना ( उबाठा ) चे तालुका प्रमुख संदीप वैरागडे, माजी संघटक नरसिंग मादर, युवासेना उपजिल्हा प्रमुख कुणाल कुडे, युवासेना कोरपना तालुका प्रमुख अंकुश वांढरे, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, गोवरीच्या सरपंच आशाताई उरकुडे, रामपूरच्या सरपंच निकिताताई झाडे, मानोली बाबापूरच्या उपसरपंच सत्यशीला वरारकर, विभाग प्रमुख अमोल कोसूरकर, विभाग प्रमुख बबलू कुशवाह,ग्रा.पं. सदस्य निलीमा कोसूरकर, निलिमा देवाळकर राजुरा तालुका शिवसेना पदाधिकारी, एच. एम.एस. युनियन पदाधिकारी आणि तालुक्यातील महिला, युवक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी उपविभाग प्रमुख ग्रा. पं. सदस्य मनोज कुरवटकर, पं.स. विभाग प्रमुख सुरज नक्कावार, उपविभाग प्रमुख प्रफुल मादास्वार, संदिप घ्यार, गणेश चौधरी, राजू लोणारे यांनी मेहनत घेतली.