Home Breaking News Chandrapur dist@ news • मंडळ अधिकारी निरंजन गोरेंचा रेती तस्करास दणका !...

Chandrapur dist@ news • मंडळ अधिकारी निरंजन गोरेंचा रेती तस्करास दणका ! •अवैध रेतीचे ट्रॅक्टर केले रात्री जप्त! •गोपनिय माहितीच्या आधारे हिंमतबाज गोरेंचे कारवाई सत्र सुरूच

286

Chandrapur dist@ news
• मंडळ अधिकारी निरंजन गोरेंचा रेती तस्करास दणका ! •अवैध रेतीचे ट्रॅक्टर केले रात्री जप्त!
•गोपनिय माहितीच्या आधारे हिंमतबाज गोरेंचे कारवाई सत्र सुरूच

चंद्रपूर : किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्याच्या राजूरा तहसिल मधील राजूराचे विद्यमान मंडळ अधिकारी निरंजन गोरे यांनी गुप्त माहितीच्या आधारे दि.१ मार्चला मध्यरात्री एका रेती तस्कराचे अवैध रेतीचे ट्रॅक्टर जप्त केल्याचे वृत्त आहे.सध्या शासकीय कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात असतांना देखिल त्यांनी आपले कर्तव्य इमानेइतबारे पार पाडले असल्याचे एकंदरीत दिसून येते.या पूर्वी त्यांनी याच तालुक्यात अवैध रेतीचे सहा वाहने जप्त केली होती.हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.जिवती येथे तलाठी असतांनाही त्यांची कामगिरी कौतुकास्पद व अभिनंदनिय अशीच होती.पदोन्नती मिळाल्यानंतर ही त्यांनी शासकीय कामे तेवढ्याच जबाबदारीने पार पाडायचे असा संकल्प त्यांनी आपल्या मनाशी केला आहे.
राजूरा तालुक्यात रेती तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची जनतेची ओरड असतांना त्यांनी गुप्त माहितीच्या आधारे जीव धोक्यात घालून मध्यरात्री ही कारवाई केली आहे.सदरहु ट्रॅक्टर मालकाचे नांव सचिन लवंदे असे सांगितल्या जाते.चुनाळा येथे ही कारवाई केली असून दंडात्मक कारवाईसाठी उपरोक्त जप्तीतील वाहन त्यांनी तहसिल कार्यालयात जमा केले आहे.त्यांच्या या मध्यरात्रीच्या कारवाईमुळे रेती तस्करांचे अक्षरशः धाबे दणाणले आहेत.हे मात्र तेव्हढेच सत्य आहे.