Chandrapur dist@ news
• रेती माफियास महसूल पथकाचा परत एक दणका! अनेक महसूल पथक चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत!
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपूर :जिल्ह्यातील अवैध गौण खनिजांवर अंकूश लावण्यासाठी व दंडात्मक कारवाई करण्यासाठी या पूर्वीच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना सुचना केल्या आहेत.त्याच अनुषंगाने तहसिलदार यांनी स्वतंत्र महसूल पथक तयार केले आहे.दरम्यान राजूरा येथील एका महसूल पथकाने नुकतेच गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेतीचे एक ट्रॅक्टर जप्त केल्याचे समजते.ही कारवाई मौजा विरुर रेल्वे गेट जवळ केली असून या फिरत्या पथकात प्रामुख्याने मंडळ अधिकारी एस .एम. साळवे, मंडळ अधिकारी निरंजन गोरे तलाठी शेंडे यांचा समावेश होता.सदहु अवैध रेतीचे ट्रॅक्टर पोलिस स्टेशन विरुर येथे लावले आहे.चार दिवसांपूर्वीच महिला मंडळ अधिकारी वनिता रामटेके व त्यांच्या पथकातील काही कर्मचा-यांनी अवैध रेतीचे दोन वाहने तहसिल कार्यालयात जमा केली होती.हे येथे उल्लेखनीय आहे.कोरपना महसूल पथकाने देखिल काल अवैध गौण खनिजांच्या बाबतीत मोठी कारवाई केल्याचे वृत्त आहे.दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल पथक गुप्त माहितीच्या आधारे अवैध गौण खनिजांवर मोठ्या प्रमाणात कारवाया करीत असल्याचे एकंदरीत दिसून येते.