Home Breaking News chandrapur city @news •शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांना सीबीएसई पॅटर्नचा दर्जा देण्यात...

chandrapur city @news •शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांना सीबीएसई पॅटर्नचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी चंद्रपूरात वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन!

32

chandrapur city @news
•शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांना सीबीएसई पॅटर्नचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी चंद्रपूरात वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन!

चंद्रपूर :किरण घाटे

महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्वच शाळा ह्या सिबीएसईच्या पॅटर्नच्या करण्यात याव्या, शिक्षण हे गुणवत्तापूर्वक व दर्जेदार मिळाला हवे, शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी व स्वच्छ स्वच्छतागृह असायला पाहिजे, 14 वर्षे वयापर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण मिळायला हवे, मुलींना सॅनिटरी हे विनामुल्य मिळाले पाहिजे आदिं विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने काल चंद्रपूरच्या महानगरपालिका समोर वंचितच्या चंद्रपूर महानगर अध्यक्ष तनूजा रायपूरे व महासचिव मोनाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुपारी आंदोलन करण्यात आले.या वेळी अनेकांनी उपरोक्त मागण्या रास्त असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले.संध्याकाळी एका शिष्टमंडळाने मनपाचे आयुक्त यांना मागण्यांचे एक लेखी निवेदन सादर केले. यावेळी चंद्रपूर महानगर वंचित महिला आघाडीच्या अध्यक्ष तनुजा रायपुरे, महासचिव मोनाली पाटील ,प्रज्ञा रामटेके ,वंदना ढोक ,वंदना ढवळे, राजकला रंगारी , शोभा वाघमारे , इंदुताई डोंगरे , विद्या टेंभरे,उषा डोंगरे शामकला जीवने, मायाताई रायपुरे ,कांता वाघमारे ,माया मून , संगिता चिवंडे, प्रतिभा मून शोभा तामगाडगे चंद्रकला रामटेके ,सुनंदा भगत ,प्रीती रामटेके, अर्चना आमटे , विश्रांती डांगे, दमयंती तेलंग ,रेखा उमरे, सुनंदा फुलमाळी, ज्योती उंदीरवाडे, नंदा जीवने, पार्वती भगत
रवींद्र उमाठे ,मंगला शेंडे, कविता फुलझेले ,एडवोकेट श्रध्दा गोवर्धन, पौर्णिमा उल्हास जूनगरे ,नभा संदीप वाघमारे, अधिवक्ता पुनम वाघमारे आदिं उपस्थित होते.