Home Breaking News Gadchiroli dist @news • स्मार्टफोन मुळे अंगणवाडीतील रजिस्टर होणार हद्दपार:मंत्री धर्मराव...

Gadchiroli dist @news • स्मार्टफोन मुळे अंगणवाडीतील रजिस्टर होणार हद्दपार:मंत्री धर्मराव बाबा आत्राम • अंगणवाडी सेविकांना २३८ मोबाईल वाटप

127

Gadchiroli dist @news

• स्मार्टफोन मुळे अंगणवाडीतील रजिस्टर होणार हद्दपार:मंत्री धर्मराव बाबा आत्राम
• अंगणवाडी सेविकांना २३८ मोबाईल वाटप

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत: संपादक

अहेरी: अंगणवाडी केंद्रात बालकांना पोषण आहार दिला जातो. त्यांचे वजन,उंची त्यांना मिळणारा सकस आहार याकडे लक्ष दिले जाते. या सर्व कामांचा लेखाजोखा सेविकांना विविध रजिस्टर मध्ये लिहून ठेवावा लागत होता.मात्र, शासनाकडून आता अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन दिल्याने अंगणवाडीतील विविध रजिस्टर आता हद्दपार होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी बाल विकास प्रकल्प कार्यालय,अहेरी द्वारा आयोजित अंगणवाडी सेविकांचा सन्मान व मोबाईल वाटप कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे भाग्यश्री ताई आत्राम,प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, तहसीलदार हमीद सय्यद,गटविकास अधिकारी राहुल वरठे,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोनवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अंगणवाडी सेविकांचे विविध प्रश्न प्रलंबित होते.काही प्रश्न सोडविण्यात आले असून उर्वरित प्रश्न देखील मंत्रिमंडळात सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.त्यामुळे अंगणवाडी सेविकानी काळजी करू नये असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान बाल विकास प्रकल्प कार्यालय अहेरी अंतर्गत कार्यरत तब्बल २३८ अंगणवाडी सेविकांना व पर्यवेक्षिकांना मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते स्मार्ट फोन वाटप करण्यात आले.त्यामुळे अंगणवाडी केंद्रांची ही आता डिजिटल कडे वाटचाल सुरू झालेली आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी उपस्थित पर्यवेक्षिका व अंगणवाडी सेविकांना मोलाचे मार्गदर्शन केले.तर बाल विकास प्रकल्प कार्यालय कडून पाहुण्यांचे शॉल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी तालुक्यातील विविध भागातून आलेल्या अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.