Home Breaking News • स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन थाटात व उत्साहात...

• स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन थाटात व उत्साहात साजरा! •विविध स्पर्धेंचे आयोजन कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती!

372

• स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन थाटात व उत्साहात साजरा!
•विविध स्पर्धेंचे आयोजन कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती!

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर शहरातील स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दि.8 व 9 मार्चला विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच समाजातील काही महिलांचा सत्कार सोहळा घेण्यात आला. महिलांमध्ये असलेल्या विशेष कला गुणांचा गौरव तसेच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्व स्तरावरील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्वामी समर्थ महिला मंडळ ‘नेहमीच तत्पर असते.त्याचा एक भाग म्हणून या वर्षी सुध्दा जागतिक महिला दिन अतिशय थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून शहरातील सामाजिक महिला कार्यकर्त्या कल्याणी जोरगेवार लाभल्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून या वेळी यंग चांदाब्रिग्रेड महिला आघाडीच्या शहर संघटिका वंदना हातगांवकर,उत्कृष्ट महिला मंचच्या अध्यक्ष छबू वैरागडे ,माजी महिला व बालकल्याण सभापती अनुराधा हजारे, अधिवक्ता क्षमा धर्मपुरिवार उपस्थित होत्या.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मीनाक्षी रोहनकर, उज्वला करडभाजणे, रंजना माणूसमारे, लता ढोके , पुष्पांजली सोनुले ,दिपाली रोहनकर यांनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले. विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या नसरीन शेख, प्रज्ञा नागपुरे जिवनकर, प्रज्ञा गंधेवार व मेघा मावळे यांचा सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण सुवर्णा विजय लोखंडे यांनी केले. सर्व स्तरावरील महिलांना एक व्यासपीठ मिळवून देणे व त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करणे हाच आमचा मुळ उद्देश असून तो गेल्या अनेक वर्षापासून आम्ही उत्तम रित्या पार पडत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तर वृषाली धर्मपुरीवार यांनी महिला दिनाचा उद्देश सांगितला. त्या बोलताना म्हणाल्या की महिला ही समाजाचा व घरचा मुख्य पाया असून समाजातील व घरातील सुसंस्कार संस्कृती जपणे ही तिची जबाबदारी असते ती ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडू शकते .
मातृत्व वस्तीस्थर संस्था यांच्या नेतृत्वाखाली बचत गटाच्या माध्यमातून अनेक खाद्यपदार्थाचे व कलाकृतीचे स्टॉल कार्यक्रम स्थळी लावण्यात आले होते. ज्या माध्यमातून सर्वसाधारण महिलांच्या उद्योगाला व तिच्यात असलेल्या कौशल्यतेला वाव मिळावा हा उद्देश सार्थकी लावण्यासाठी महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना ही संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.
महिलांनी सुरेख नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करीत त्यांची मने जिंकली. याच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध मंडळात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली .यातून त्यांच्या कलागुणांना एक व्यासपीठ मिळाले. त्यानंतर कलाकारांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विशेष अतिथी म्हणून लाभलेल्या सर्व महिलांचा रोपटे देऊन त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
आयोजित कार्यक्रमाला अनेकांचे सहकार्य लाभले .विशेष म्हणजे अपर्णा चिडे, प्रतिभा रोकडे, ज्योती नामेवार, रंजना मानुसमारे , ज्योती भेंडाळे , लता ढोके ,चेतना राऊत, रेणुका माता योग मंडळ, स्वरांकित भजन मंडळ, लॉ कॉलेज योगा मंडळ, शिवमंदिर योगा ग्रुप, साई मंदिर योगा ग्रुप, छत्रपती नगर भजन मंडळ, तसेच स्वामी समर्थ महिला मंडळ, योगा ग्रुप, बचत गट, जेष्ठ नागरिक संघ, कुल निर्माण संस्था व वार्डातील नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे सुरेख संचालन मीनाक्षी रोहनकर व मीना मद्दावार यांनी केले विशेष सहकार्याबद्दल चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार , ब्रिलीयंट ॲकॅडमीच्या संचालिका मेघा माळवे , ओमप्रकाश सिंग भैय्या , कुल निर्माण बहुद्देशियसंस्थेचे अध्यक्ष सलीम शेख आभार स्वामी समर्थ शारदा महिला मंडळ तसेच मातृत्व वस्तिस्तर संस्थेच्या अध्यक्षा यांचे गुरूकुंज उद्यान समितीच्या अध्यक्षा सुवर्णा लोखंडे यांनी आभार मानले .