Home Breaking News Mul taluka @news •रेती तस्करांचे रोजंदार झाले फेल , फिरते पथक ठरले...

Mul taluka @news •रेती तस्करांचे रोजंदार झाले फेल , फिरते पथक ठरले यशस्वी! •मूल महसूल पथकाच्या कामगिरीचे अनेकांनी केले स्वागत! सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)

332

Mul taluka @news
•रेती तस्करांचे रोजंदार झाले फेल , फिरते पथक ठरले यशस्वी!
•मूल महसूल पथकाच्या कामगिरीचे अनेकांनी केले स्वागत!

सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)

मूल तालुक्यातील नदी घाटावरुन अवैध रेती चोरुन नेणा-या रेती तस्करांच्या मुसक्या महसूल विभागाच्या फिरत्या पथकाने आज (शनिवारी) चांगल्याच आवळल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.पथकाने जेव्हा या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांना ताब्यात घेतले तेव्हा रेती तस्करांनी पाळतीवर ठेवलेल्या रोजंदार व्यक्तींना देखील याची पुसटशी कल्पना आली नाही.नेहमी प्रामाणिकपणे काम करणारे ( पाळत ठेवणारे)रोजंदार मात्र फेल ठरले तर मूल महसूल विभागाच्या पथकाने आज पहाटे आपली कामगिरी चोख बजावत चार वाहनांना दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले.दरम्यान या अवैध रेती वाहनांना पकडण्यासाठी महसूल विभागाच्या पथकाने सापळा रचला होता.यासाठी त्यांनी जीव धोक्यात घालून अख्खी रात्र जागून काढली शेवटी त्यांच्या पदरात यश पडले . गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी ही यशस्वी कामगिरी बजावत चार वाहनांना मूलच्या तहसिल कार्यालयात जमा केले.त्या चार वाहना पैकी एक वाहन खाली होते.पण ते वाहन रेती नेण्याच्या उद्देशाने घाटावर आले होते.रात्रीचा फायदा घेत रेती तस्करांनी या भागातून अवैध रेती नेण्याचा चांगलाच सपाटा लावला होता.चढत्या भावाने हेच रेती तस्कर ग्राहकांना रेती विकत असल्याची चर्चा या भागात ऐकावयास मिळाली . तालुक्यात अवैध रेती नेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याच्या तक्रारीही दिवसेंदिवस वाढत होत्या.पोलिस व महसूल विभागाचे फिरते पथक या रेती तस्करांवर नजर ठेवून होते.परंतु त्यांची नजर चुकवून हेच रेती तस्कर आपले काम फत्ते करीत होते.शेवटी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसत ह्या रेती तस्करांना चांगलाच दणका दिला.आजच्या या धडाकेबाज कारवाईचे जनतेंनी स्वागत केले असून ही मोहीम अशीच राबवावी व अवैध रेती तस्करांना योग्य धडा शिकवावा अशी रास्त अपेक्षा मूलसह तालुक्यातील जनतेंनी व्यक्त केली आहे.याच तालुक्यातील बड्या रेती तस्करांवर चंद्रपूरच्या फिरत्या पथकाची नजर असल्याचे विश्वसानिय वृत्त आहे.महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अनेक रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत हे मात्र तेव्हढेच खरे आहे.