Home Breaking News Ballarpur taluka@ news •बल्हारपूरच्या पोलिस निरीक्षक आसिफराजा शेखने केली मध्यरात्री अवैध...

Ballarpur taluka@ news •बल्हारपूरच्या पोलिस निरीक्षक आसिफराजा शेखने केली मध्यरात्री अवैध रेती तस्करांवर धडाकेबाज कारवाई !

353

Ballarpur taluka@ news

बल्हारपूरच्या पोलिस निरीक्षक आसिफराजा शेखने केली मध्यरात्री अवैध रेती तस्करांवर धडाकेबाज कारवाई !

सुवर्ण भारत: विशेष प्रतिनिधी

बल्लारपूर :- बल्लारपूर तालुक्यातील खुलेआम अवैध वाळू तस्करीचा धंदा सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक आसिफराजा शेख यांना मिळाल्यानंतर बल्लारपूर पोलिसांनी विसापूरच्या वर्धा नदी घाटासमिप शेतात लपून ट्रॅक्टर येण्याची वाट पाहत, आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास वाळू तस्करीचा व्यवसाय सुरू झाला. वाळूने भरलेला ट्रॅक्टर, दिवे बंद करून एका शेतात उभा होता, त्याचप्रमाणे इतर दोन ट्रॅक्टर आल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून तीन ट्रॅक्टरसह चार जणांना ताब्यात घेतले. या वेळी २१,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला
उपरोक्त कारवाईत बल्लारपूर पोलिसांनी आरोपी बंडू जनार्दन कोवे वय ४२ वर्ष, राजू देवराव टेकाम वय ३५ वर्ष, रवी गट्टय्या आडे वय ३४ वर्ष, सागर चंकुजी कोडापे वय २८ वर्ष चौघेही रा. विसापूर यांना वर्धा नदीच्या पात्रातून अटक केली. तर ट्रॅक्टर मालक संजय पंदीलवार, मच्छिंद्र देवराव कुळमेथे, बंडू अण्णाजी नांदे हे फरार झाले.
पोलिसांनी अप क्र. ४९३/२४ ३७९ १०९, ३४ भांदवी सह कलम ४८(७), ४८(८) ४, २१, खानी आणि खनिज (निकास आणि नियोजण) अधि. १९५७, सह कलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अधि १९८४, प्रमाणे गुन्हा नोंद करून कारवाई केली असल्याचे वृत्त आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक असिफराजा शेख, सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार पांडे, पोलिस उपनिरीक्षक गोविंद चाटे, पोलिस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे, पोहवा वामन शेंडे, चापोशी कैलास, विलास खरात,प्रकाश, मडावी, मिलिंद आत्राम आदिंनी यशस्वीरित्या केली.