Home Breaking News Chandrapur city @news • चंद्रपूर शहरातील मनपाच्या अतिक्रमण हटविण्याच्या कार्यवाहीवर निर्माण होतेय...

Chandrapur city @news • चंद्रपूर शहरातील मनपाच्या अतिक्रमण हटविण्याच्या कार्यवाहीवर निर्माण होतेय प्रश्नचिन्ह!

113

Chandrapur city @news
• चंद्रपूर शहरातील मनपाच्या अतिक्रमण हटविण्याच्या कार्यवाहीवर निर्माण होतेय प्रश्नचिन्ह!

चंद्रपूर :चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने धडाक्यात शहरातील अतिक्रमण हटविण्याचे काम नुकतेच करण्यात आले. त्या साठी चंद्रपूरात विशेष मोहीम राबविण्यात देखील आली. अतिक्रमण हटविले जाणे ही एक सकारात्मक पायरी आहे, परंतु यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. अतिक्रमण केलेल्या ठिकाणी, महानगरपालिका संबंधित व्यक्तींकडून दररोज 10 ते 30 रुपये कर आकारत होते. ही वस्तुस्थिती आहे.या कराच्या स्वरूपाने असे दिसून येते की, महानगरपालिका अतिक्रमणाला प्रत्यक्षपणे मान्यता देत होती. असे रस्त्यावरील रोजी रोटी करणारे सांगत आहेत.

नागरिकांच्या हितासाठी आणि शहराच्या सुव्यवस्थेसाठी महानगरपालिकेने कडक पावले उचलली पाहिजेत. सोबतच गरीब दुकानदाराच्या रोजी रोटीचा प्रश्न देखील सोडविला पाहिजे.

आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगरचे अध्यक्ष योगेश गोखरे यांनी मनपा आयुक्तांना प्रश्न विचारला आहे की, कर आकारणी करून अतिक्रमणास मान्यता देण्याचे तात्पर्य काय? मनपा आयुक्तांनी नागरिकांच्या हिताचे काम करण्यास प्राधान्य दिले पाहिजे शहरातील अतिक्रमण काढण्याच्या कामात पारदर्शकता आणि न्यायसंगतता असावी.

महानगरपालिकेने यापुढे नागरिकांच्या ज्वलंत समस्या व अडचणी समजून घेत त्यावर कार्यवाही करावी शिवाय शहरातील सुव्यवस्था आणि स्वच्छता कायम ठेवावी ही आम आदमी पार्टीची प्रमुख मागणी आहे.