Home Breaking News Chandrapur city@news • धम्मभुमी महाविहार येथे उत्तम दर्जाचे धम्म विपश्यना केंद्र तयार...

Chandrapur city@news • धम्मभुमी महाविहार येथे उत्तम दर्जाचे धम्म विपश्यना केंद्र तयार करण्याचा आ. किशोर जोरगेवारांचा संकल्प! • बुध्द पोर्णिमा निमित्त बाबुपेठला कार्यक्रमाचे आयोजन ! अनेकांची उपस्थिती!

96

Chandrapur city@news
• धम्मभुमी महाविहार येथे उत्तम दर्जाचे धम्म विपश्यना केंद्र तयार करण्याचा आ. किशोर जोरगेवारांचा संकल्प!
• बुध्द पोर्णिमा निमित्त बाबुपेठला कार्यक्रमाचे आयोजन ! अनेकांची उपस्थिती!

चंद्रपूर – समाजात अभूतपूर्व बदल घडवून आणण्यात भगवान गौतम बुध्द यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणीतुन अनेकांच्या मनात समाजासाठी प्रेमाची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या हिंसा, करुणा, शांती या विचारांमुळे समाजाला आदर्श मार्ग मिळाला. चंद्रपूरात धम्म विपश्यना केंद्र तयार करण्याची इच्छा होती. ती इच्छा पूर्णत्वास येणार असून धम्मभूमी महाविहार च्या 8 एकर जागेवर धम्म विपश्यना केंद्र तयार करण्याचा संकल्प आपण केला असल्याचे प्रतिपादन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
बुध्द पोर्णिमा निमित्त बाबूपेठ येथील धम्मभुमी महाविहार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्रद्धेय भंतन सुमनवन्नो महाथेरो, सचिव महाराष्ट्र भिक्कु संघ, अक्षय गोवर्धन, संतोष रामटेके, अनिकेत रामटेके, श्रध्दा आंबेकर, विनोद रामटेके, बुध्दांन उराडे, रितेश निमगडे, प्रतीक ढवळे, शिला उमरे, शारदा कांमळे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मी आमदार होऊ शकलो. शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा त्यांनी दिलेला मंत्र आपण अंगीकारला पाहिजे. मात्र आजच्या व्यवस्थेत उत्तम दर्जाचे शिक्षण घेणे परवडणारे नाही. त्यामूळे आपण मतदार संघात 11 अभ्यासिका तयार करण्याच संकल्प केला होता. यातील 8 अभ्यासिकेंचे कामे जवळपास पूर्ण झाली आहे. तर काही कामे प्रगतीपथावर आहे. यातील एक अभ्यासिका आपण पवित्र दिक्षाभुमी येथे तयार करत आहोत. त्या अभ्यासिकेची नुकतीच आपण पहाणी केली. याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. एक लाख पूस्तके या अभ्यासिकेत असणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
धम्मभुमी महाविहार बुध्द विहार येथे आल्यावर नवी चेतना मिळाली आहे. हे शांतीचे केंद्र आहे. आपण उत्तम व्यवस्था येथे केली आहे. सुंदर असा परिसर आपण विकसीत करत पावन स्थळ तयार केले आहे. येथून तथागत गौतम बुद्ध यांच्या समाजोपयोगी विचारांचा येथून प्रचार प्रसार होत आहे. या शांती केंद्राचा विकास झाला पाहिजे तुमची आणी माझी ही इच्छा असून नक्कीच हे विहार चंद्रपूरातील उत्तम दर्जाचे धम्म विपश्यना केंद्र बनेल असा विश्वास यावेळी आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार जोरगेवार यांनी तथागत गैतम बुध्द आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करुन वंदन केले. यावेळी स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.