Varora city@ news
• वरोरा नगरपरिषदेच्या नाकर्तेपणामुळे मोकसी ले आऊटवासीयांची होणार जलसमाधी!
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा
वरोरा :वरोरा शहराच्या मध्यवर्ती भागात मोकसी ले आऊट असून खोलगट भाग असल्याने या ले आउट मध्ये नगरपालिकेने शहरातल्या अनेक भागातल सांडपाणी आणून सोडलं आहे.वर्षभर नाल्या तुंबून भरलेल्या असते. नाल्या सफाई कर्मचारी सुद्धा तिथे यायला घाबते.गेल्या वीस वर्षापासून अनेकदा अर्ज विनंत्या करूनही सदर सांडपाण्याची विल्लेवाट न लावता उलट शहरातलं सांडपाणी तिथे आणून सोडलं परंतु सांडपाणी बाहेर काढण्यासाठी नगरपरिषदेने कोणताही स्थायी उपाय केलेला नाही. पावसाळ्यात थातुरमातुर वेळेवर खोरखार करतात परंतु अवघ्या शंभर फूट अंतरावर असलेल्या मुख्य मोहबाळा रोडपर्यंत नाल्या न करता अर्धवट सोडून दिल्याने घरासभोताल भर उन्हाळ्यात कंमरभर घाण सांडपाणी साचून असते. त्यामुळे डेंगू मलेरिया सारखे आजार या ले आऊट वासियांच्या पाचवीलाच पूजले आहे. डुकरं आणि मोकाट जनावरे तर या अर्धवट नाल्यांच्या गढ्यात पडून मरणे तर नेहमीचेच झाले आहे. वर्षभर घाण दुर्घधीचा सामना करावा लागतो.
या वर्षाला तर मोहबाळा रोड लगतच्या देशपांडे, कोटावार, कुरेकार या ले आऊट धारकांनी कोणताही विकास न करता चार पाच फूट भरण भरले आहे त्यामुळे ओव्हर फ्लो पाणी निघण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने पावसाळ्यात मोकसी ले आऊट मधील बऱ्याच घरांना जलसमाधी मिळेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. याला नगरपरिषदेचा नाकर्टेपणा जबाबदार आहे.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी सदर पाणी लेआऊट च्या बाहेर काढण्यासाठी परत आज दि.२८/५/२०२४ ला मुख्याधिकारी नगर परिषद, आमदार वरोरा, उपविभागीय अधिकारी वरोरा यांना निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी स्थायी उपाय करण्यात यावा तसेच रहिवासीयांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अविकसित ले आउट धारक तथा खाली प्लाटधारकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करून पंधरा दिवसात कार्यवाही न केल्यास नगरपरिषदे समोर सर्व ले आउट रहिवासी उपोषणाला बसणार असल्याचे दिलेल्या निवेदनात कळवण्यात आले आहे. रहिवासी रामचंद्र सालेकर,अरुण ढोके,नविनचंद्र फुलझेले,दौलत मत्ते,धनराज आसेकर,आनंदराव वैद्य,अनंता चौखे,राजु झाडे… आदींनी समस्यांची आपभीती अधिकाऱ्यांपुढे कथन केली.