Home Breaking News Varora taluka@ news •यळकोट यळकोट जय मल्हार घोषणाने वरोरा नगरी दुमदुमली

Varora taluka@ news •यळकोट यळकोट जय मल्हार घोषणाने वरोरा नगरी दुमदुमली

42

Varora taluka@ news
•यळकोट यळकोट जय मल्हार घोषणाने वरोरा नगरी दुमदुमली

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर

वरोरा : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती वरोरा तर्फे 299 वी अहिल्यादेवी जयंती उत्सव अहिल्यादेवी वृद्धाश्रम बोर्डा, वरोरा येथे साजरी करण्यात आली.

प्रथम सकाळी आनंदवन चौकातून यळकोट यळकोट जय मल्हार घोषणाबाजीने संपूर्ण वरोरा शहरात बाईक रॅली काढण्यात आली.
यावेळी रॅलीत विशेष आकर्षण म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा करण्यात आली.
या कार्यक्रमाला जयंतीच्या सोहळ्याचे उदघाटन साईनाथ बुच्चे, होते तर अध्यक्षस्थानी डाँ सरवदे, होते प्रमुख उपस्थिती कैलास उराडे, वामन तुरके, बाळासाहेब पडवे, डाँ. प्रफुल खुजे, सोनूताई येवले, मुकेश जिवतोडे उपस्थित होते.

याप्रसंगी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माळ्यार्पण करून कार्यक्रमाला सुरवात केली. प्रमुख पाहुण्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या जिवन कार्याला उजाळा दिला. अहिल्यादेवी यांनी राज्य कारभार कसा चालवला, शेतकऱ्यांनसाठी किती धोरणे आणली, हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार कसा केला, अहिल्यादेवीना समाजात देवीचे स्थान कसे प्राप्त झाले, या बाबतची सविस्तर मार्गदर्शन उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी भाषणा द्वारे अहिल्याभक्त व धनगर समाज बांधवाना सांगितली.

यावेळी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थीचा सत्कार सुष्ट्री बारतीने, जानव्ही तुराळे, वैद्यकीय अधीक्षक डाँ प्रफुल खुजे यांचा सत्कार करण्यात आला. राजकीय सत्कार वामन तुरके व विलास झिले यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच अहिल्यादेवी यांचे वेशभूषा साकार केलेल्या इशिता विलास काळे व किमया सचिन मुंगल यांचा अहिल्यादेवी ची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीचे संस्थापक संजय बोधे, संचालन उत्सव समितीचे आयोजक गणेश चिडे, आभार प्रदर्शन आशिष शेळकी तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीचे अध्यक्ष शिरीष उगे, कोषध्यक्ष भूषण झिले, उपाध्यक्ष अजिंक्य काळे, कुसुम वैद्य, छाया धवणे, नितीन भोजेकर यांनी केले व कार्यकमाला वरोरा तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.