Ballarpur city@ news
•बल्लारपूर आप पक्षा तर्फे महिला राजकीय सशक्तीकरण कार्यक्रम संपन्न
सुवर्ण भारत: शंकर महाकाली ( संपादक)
बल्लारपूर : दिनांक ३१ मे २०२४ रोजी आम आदमी पक्षा तर्फे शासकिय गेस्ट हाऊस मध्ये महिला राजकिय सशक्तीकरण सभा आयोजित करण्यात आली. हि सभा आयोजित करण्यात शहर महिला अध्यक्षा किरण खन्ना व उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी यांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला. या सभेत जिल्हा उपाध्यक्ष प्रा.नागेश्वर गंडलेवार व सुरज ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजकिय क्षेत्रात महिलांचा सहभाग, सध्या स्थितीत महिलांचे राजकिय सहभाग याविषयावर शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. यावेळेस कार्यक्रमाचे संचालन शहर संघठन मंत्री रोहित जंगमवार एव महिला सचिव शितल झाडे यांनी केले व बल्लारपूर शहरातील सर्व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
