Home Breaking News Chandrapur city@ news • चंद्रपूर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दारूल उलूम...

Chandrapur city@ news • चंद्रपूर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दारूल उलूम मदरसाला भेट देऊन स्लेटर हाऊसच्या जागेची केली पाहणी!

195

Chandrapur city@ news
• चंद्रपूर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दारूल उलूम मदरसाला भेट देऊन स्लेटर हाऊसच्या जागेची केली पाहणी!

सुवर्ण भारत: शंकर महाकाली

चंद्रपूर :चंद्रपूर चे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांनी आगामी ईद उल अज़हा बकरी ईद या सणानिमित्त दारुल उलूम मोहम्मदीया येथे भेट दिली असून स्लेटर हाऊस च्या जागेची पाहणी केली असून तेथील पदाधिकाऱ्यांना ही भेट दिली आहे.

ईद उल अज़हा बकरी ईद या सणानिमित्त 17,18,19 सलग 3 दिवस मुस्लिम बांधवांकडून कूर्बानी केली जात असल्याने चंद्रपूर शहर महानगर पालिकेने तात्पुरते स्लेटर हाऊस करिता दारुल उलूम मोहम्मदीया कमिटी ने दिलेल्या अर्जाला अनुसरून परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे शासनाच्या सर्व नियमाचे पालन करीत तीन दिवस दारुल उलूम मोहम्मदीया च्या कंपाऊंडच्या आतील परिसरात कुरबानी प्रक्रिया सुरू राहणार आहे.त्यासाठी टाकाऊ वस्तू टाकण्यासाठी एक मोठा शोषित खड्डा खोदला जाणार आहे.

चंद्रपूर चे कर्तव्यनिष्ठ पोलिस अधीक्षक यांनी तेथील परिसराची विशेषत:
स्लेटर हाऊसच्या जागेची पाहणी करीत अत्यावश्यक निर्देश ही दिले असून कूरबानीच्या संदर्भात ही माहिती जाणून घेतली आहे हे मात्र विशेष.

चंद्रपूर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दारुल उलूम मोहम्मदीया येथे भेट दिली तेव्हा अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू ,चंद्रपुर चे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर जाधव,चंद्रपुर शहर पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी मंगेश भोंगाड़े उपस्थित होते.या भेटी दरम्यान मुम्मका सुदर्शन यांनी दारुल उलूम मोहम्मदीया चे अध्यक्ष शेख मुश्ताक रिजवी व जिल्हा शांतता समिति सदस्य सय्यद रमज़ान अली यांचेशी संवाद साधले. दारुल उलूम मोहम्मदीया चे कारी अब्दुल वकील, तसेच विशेष शाखेचे दिलीप कुर्जेकर व लक्ष्मण रामटेके हजर होते.