Home Breaking News वनविभागाने वनमजूराला केले सेवेतून सेवानिवृत्त पण “त्या ” मजूराचा दहा महिन्यांचा पगार...

वनविभागाने वनमजूराला केले सेवेतून सेवानिवृत्त पण “त्या ” मजूराचा दहा महिन्यांचा पगार अजूनही प्रलंबित?

239

वनविभागाने वनमजूराला केले सेवेतून सेवानिवृत्त पण “त्या ” मजूराचा दहा महिन्यांचा पगार अजूनही प्रलंबित?

चंद्रपूर : किरण घाटे

चिचपल्ली वनपरिक्षेत्रात सन १९८६पासून बारमाही वनमजूर म्हणून मूल येथील रविकिशोर गुलाब खोब्रागडे हे कार्यरत होते. त्यांना माहे नोव्हेंबर २०२१ला साठ वर्षं पूर्ण झाल्याने राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे सेवेतून सेवानिवृत्त करण्यात आले असल्याचे पत्र वनपरिक्षेत्र अधिकारी (चिचपल्ली प्रादेशिक) प्रियंका वेलमे यांनी दिले.या विभागात ते कार्यरत असताना अजूनही त्यांचा दहा महिन्यांचा पगार शिल्लक असल्याची तक्रार त्यांनी विभागीय वनअधिकारी चंद्रपूर यांच्या कडे सादर केली होती.पण त्या तक्रारीची साधी दखल संबंधित विभागाकडून घेण्यात आली नव्हती .शेवटी रविकिशोर खोब्रागडे यांनी सामान्य कामगार सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांच्या कडे लेखी स्वरूपात तक्रार सादर केली. याच तक्रारीच्या आधारे समर्थ यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे दि.६ मे ला एक निवेदन देवून या गरीब वनमजूरास तातडीने न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.या शिवाय समर्थ यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या कडे देखिल याच बाबतीत निवेदन सादर केले असल्याचे त्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.अजूनही त्या सेवानिवृत्त वनमजूराचे वेतन त्यास मिळाले नाही .या वरुन वनविभागातील काम किती मंदगतीने चालते याची आपणास साहजिकच कल्पना येवू शकते.