Home Breaking News Chandrapur city@ news • बाबूपेठ परिसरातील विविध मागण्यां व समस्यांचा पाढा वाचला...

Chandrapur city@ news • बाबूपेठ परिसरातील विविध मागण्यां व समस्यांचा पाढा वाचला राजू कुडेंनी खा.प्रतिभा धानोरकरांसमोर! खा.धानोरकरांची बाबूपेठ येथे भेट

407

Chandrapur city@ news
• बाबूपेठ परिसरातील विविध मागण्यां व समस्यांचा पाढा वाचला राजू कुडेंनी खा.प्रतिभा धानोरकरांसमोर!
खा.धानोरकरांची बाबूपेठ येथे भेट

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

चंद्रपूर : किरण घाटे गेल्या कित्येक वर्षांपासून बाबूपेठ येथील रेल्वे पुलाचे काम रखडलेले असून त्याच कामाची पाहणी करण्यासाठी आज चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बाबूपेठ येथे भेट दिली.या वेळी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी त्यांच्या समोर या परिसरातील विविध समस्यां व मागण्यांचा पाढाच वाचला. तद्वतच खा.धानोरकर यांना या वेळी आम आदमी पार्टीच्या वतीने एक लेखी निवेदन देखील देण्यात आले.ह्या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्यांचा समावेश होता.
बाबूपेठ परिसरातील ऐतिहासिक असणाऱ्या विहिरीला सुरक्षा जाळी बसवणे,बाबूपेठ मधून बल्लारशाकडे जाणाऱ्या विद्युत वाहक तारांना अंडर ग्राउंड करणे, सिद्धार्थ नगर या ठिकाणी मनपाच्या जीर्ण अवस्थेत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा इमारतीचे नवीन बांधकाम काम करणे, कासव गतीने सुरु असलेल्या बाबुपेठ ब्रिजच्या कामा संदर्भात ठेकेदारावर कामात विलंब केल्याबाबत कायदेशीर कारवाई करणे !
उपरोक्त निवेदन सादर करताना
युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, संघटन मंत्री मनीष राऊत, जिल्हा सचिव आदित्य नंदनवार, प्रशांत रामटेके, सुशांत धकाते, अक्षय गोवर्धन, हरिदास पिंगे, दुर्गे आदिं पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.