Home Breaking News Beed dist @news •शेतकर्‍यांना सरसगट विनाअट पीककर्ज माफी करिता किसान सभेचे धरणे...

Beed dist @news •शेतकर्‍यांना सरसगट विनाअट पीककर्ज माफी करिता किसान सभेचे धरणे आंदोलन •जिल्हा भारतील शेतकरी विविध प्रश्नाला घेऊन शासन दरबारी

43

Beed dist @news
•शेतकर्‍यांना सरसगट विनाअट पीककर्ज माफी करिता किसान सभेचे धरणे आंदोलन

•जिल्हा भारतील शेतकरी विविध प्रश्नाला घेऊन शासन दरबारी

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे व मागील हंगामात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आला असल्याने नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या परंतु निसर्गाच्या अवकृपे पीक कर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांना सरसगट विनाअट पीक कर्ज माफी द्यावी यासह शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्नावर अखिल भारतीय किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले . याप्रसंगी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या प़सगि उपस्थित होते .
मागील हंगामातील सोयाबीन पिकाचे उर्वरित पीक विमा वाटप करण्यात यावा,दूध उत्पादक शेतकऱ्यांना भिकेला लावणारा दूध भुकटी आयात धोरणाला प्रतिबंध घालावा,रबी पीक विम्याचे वाटप करण्यात यावे,१५ जुलै पूर्वी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना विना अटी, शर्ती शासनाच्या नियमानुसार पीक कर्ज देण्यात यावे,नियमित पीक कर्जाची फेड करणाऱ्या व अडचणीमुळे पीक कर्ज फेडू न शकलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पीफकर्ण सरसकट विनाअट माफ करावे,केंद्र सरकारने घोषित केलेल्या पिकांच्या एम. एस. पी. ची किंमत वाढवून देण्यात यावी, राज्यात भावांतर योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी,शेतकऱ्यांनाही राज्य सरकारकडून शेतकरी सन्मान निधीची रक्कम योजना सुरू केलेल्या वेळेपासून सुरुवातीपासून देण्यात यावी, उसाचे चुकारे ज्याही कारखान्यांकडे प्रलंचित आहेत त्यांनी विना विलंब अदा करावेत.शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा,
जिल्ह्याभरातील ठिकठिकाणचे गावठाण फिडर पावसाळ्यापूर्वी बसवून कृषी वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर किसान सभेकडून शुक्रवार दि २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले .
किसान सभा बीडचे जिल्हाध्यक्ष एड.अजय बुरांडे,माजी जिल्हा परिषद सभापती तथा शेतकरी चळवळीचे नेते प्रभाकर वाघमोडे, माजी न्यायमूर्ती बी.आर.तिडके,कॉ.काशीराम सिरसाट,कॉ.मुरलीधर नागरगोजे,कॉ.सुदाम शिंदे,कॉ.कृष्णा सोळंके,कॉ.पप्पू सोळंके,कॉ.राजाभाऊ बादाडे,कॉ.जगदीश फरताडे,कॉ.भगवान बडे यांच्या सह आदीनी उपस्थित शेतकऱ्यांना या धरणे आंदोलन प्रसंगी संबोधित केले . या धरणे आंदोलन प्रसंगी किसान सभा बीड चे विविध पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्या भारतील हजारो शेतकरी उपस्थित होते .