Home Breaking News Beed dist @news •पंकजाताई मुंडे यांच्या मागणीला यश ! •मध्यप्रदेशच्या...

Beed dist @news •पंकजाताई मुंडे यांच्या मागणीला यश ! •मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लाडकी बहिण’ योजना सरकारने केली लागू •योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद

78

Beed dist @news

•पंकजाताई मुंडे यांच्या मागणीला यश !

•मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ‘लाडकी बहिण’ योजना सरकारने केली लागू

•योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

मध्यप्रदेशात प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय ठरलेल्या ‘लाडली बहना’ योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात
‘लाडकी बहीण’ योजना राबवण्याची मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली होती. त्या अनुषंगाने आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना महाराष्ट्र शासनाने घोषित केली असून याकरिता आवश्यक निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे .
उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला. शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्य नागरिकांच्या हिताच्या हा अर्थसंकल्प होता. दरम्यान, पंकजाताई मुंडे भाजपच्या मध्यप्रदेशात सह प्रभारी असल्याने या राज्यात महिलांसाठी लोकप्रिय ठरलेली ‘लाडली बहना’ योजना आपल्या महाराष्ट्रात देखील लागू करावी अशी मागणी त्यांनी सरकारकडे वारंवार केली होती, त्यांच्या या मागणीची दखल घेऊन राज्य सरकारने आजच्या अर्थसंकल्पात २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रूपये देणारी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजना लागू करण्याची घोषणा केली. एवढेच नव्हे तर यासाठी निधीची तरतूद देखील केली आहे. ही योजना लागू झाल्याने राज्यातील तमाम महिला वर्गात आनंद व्यक्त होत असून महिलांनी पंकजाताईंच्या मागणीला यश आल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत .