Home Breaking News Varora taluka@news • चार वर्षाच्या मुलाचा डायरीयामूळे मृत्यू? • नगरपालिकेच्या अकार्यक्षमता स्वच्छता...

Varora taluka@news • चार वर्षाच्या मुलाचा डायरीयामूळे मृत्यू? • नगरपालिकेच्या अकार्यक्षमता स्वच्छता व्यवस्था कोलमडली! •उपजिल्हा रुग्णालयाची सुद्धा आरोग्य यंत्रणा कोलमडली

32

Varora taluka@news
• चार वर्षाच्या मुलाचा डायरीयामूळे मृत्यू?
• नगरपालिकेच्या अकार्यक्षमता
स्वच्छता व्यवस्था कोलमडली!
•उपजिल्हा रुग्णालयाची सुद्धा आरोग्य यंत्रणा कोलमडली

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
वरोरा तालुका प्रतिनीधी, चंद्रपूर

वरोरा : शहरातील मालवीय वार्डातील मृतक चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.मृत्यू हा डायरी्याने झाला असावा असा अंदाज नातेवाईकांने वर्तविला आहे.मृतक मुलाचे नाव पूर्वेश सुभाष वांढरे असून उपजिल्हा रुग्णालयात त्याला उपचारर्थ आणण्यात आल्यानंतर डाक्टरांनी दोन इंजेक्शन दिली परंतु त्याला आराम झाला नाही.त्याची प्रकुर्ती गंभीर असल्यामुळे तेथील डाक्टरांनी चंद्रपूर ला हलविण्याचा सल्ला दिला.चंद्रपूरला जाताना रस्त्यातच पूर्वेश चा मृत्यू झाला.सदर घटना 5 जुलै 2024 ला रात्रौ 11 ते 12वाजताचे दरम्यान घडली.
मृतक पूर्वेश आणि त्याचा मोठा भाऊ हे दोघेही दिवसभर खेळत होते. परंतु पूर्वेशची अचानक प्रकुर्ती बिघडली. त्याला हगवन, उलट्या सुरु झाल्या. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारर्थ नेण्यात आले. त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी दोन इंजेक्शन दिली.परंतु त्याला आराम झाला नाही. त्यानंतर प्रकुर्ती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी एखाद्या खाजगी डॉक्टर कडे नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला शहरातील एका खाजगी डॉक्टर कडे नेण्यात आले. त्या डॉक्टरांनी औषध लिहून दिली ती घेतली परंतु प्रकुर्तीत सुधारणा झाली नाही. आणि पूर्णतः तो अशक्त झाला.
त्यानंतर चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्याचे दृष्ठिने ऍम्ब्युलन्स ने निघाले परंतु रस्त्यातच पूर्वेश नी आपला जिव सोडला.पूर्वेश हा अंगणवाडीचा विद्यार्थि होता.

मृतक पूर्वेश ची आई आणि आजी सुद्धा पूर्वेश च्या मृत्युंपूर्वी च उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांना सुद्धा हगवन, उलटी चा आजार जडला आहे.

उपजिल्हा रुग्णालय आरोग्य यंत्रणा कुचकामी

“उपजिल्हा रुग्णालयाचे हलगर्जीपणा मूळे मुलगा दगावला मृतक पूर्वेश च्या वडिलांचा आरोप”

||मृतक पूर्वेश ला उपचारर्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्याठिकाणी दोन इजेक्शन देण्यात आली. परंतु त्याचे प्रकुर्तीत सुधारणा झाली नाही. आणि तेथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले की आमचेकडे लहान मुलांचे डाक्टर नाही आहे. तुम्ही एखाद्या खाजगी डॉक्टर कडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. उपजिल्हा रुग्णालयात पूर्वेशवर योग्य उपचार झाला असता तर माझा मुलगा वाचला असता, डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला ||.

#सुभाष वाढई मालवीय वॉर्ड वरोरा#

नगरपालिकेची अकार्यक्षमता नागरिकांच्या माथ्यावर

पावसाळा सुरु झाला असून शहरात नाल्यामधून व्यवस्थित सांडपाणी वाहून जात नाही. घाणीचे साम्राज्य सर्वत्र असून कीटकनाशक फवारणी किंवा निर्जूतुकीकरणची कोणतीही उपाययोजना नगरपालिका प्रशासनाने केली नाही. त्यामुळे जिवजंतू चा प्रसार होत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यू, डायरीया, मलेरिया सारख्या आजारानी डोके वर काढले आहे.नगरपालिकेच्या कार्यक्षमते वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

मालवीय, खांजी वॉर्डात डायरीया आजाराची श्रुखला

शहरातील खाजी वॉर्ड आणि मालवीय वार्डात विविध आजारांनी कहरच केला आहे. पूर्वेश चा मृत्यू झाल्यानंतर दीड वर्षाच्या मुलाला हगवन, उलटी सुरु झाल्यानंतर चंद्रपूरला हल- विण्यात आले आहे. आजारांची शृंखला सुरूच असताना आरोग्य यंत्रणा आणि नगरपालिका प्रशासन गेले कुठे. असा सवाल जनता करीत आहे.

|| पूर्वेशला सहा वाजता उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. तेव्हा त्याची पूर्ण तपासणी करण्यात आली. आमचेकडे बालरोगतज्ञ् उपलब्ध नसल्यामुळे उपचार करण्याकरिता अडचण निर्माण झाली. पून्हा रात्रौ 9वाजता त्याची प्रकुर्ती बिघडली, त्यांचेवर उपचार केला. आणि प्रकुर्ती सिरीयस झाली त्यामुळे रात्रौ 11 चें सुमारास पून्हा उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर जाण्यासाठी रेफर करण्यात आले.त्याला इंजेक्शन वैगरे लावण्यात आले नाही.सदर वांढरे कुटुंब उजियन ला गेले होते. तीन चार दिवसापासून त्याला त्रास होता||

“डॉ.प्रफुल खुजे वैद्यकीय अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालया वरोरा”