Ghugus city@news
•वेतन न मिळाल्याने घुग्घुस नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारले कामबंद आंदोलनाला यश
•राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या सर्व मागण्या मंजूर
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेलेल्या शहरात नगरपरिषदेत गेल्या तीन महिन्यापासून रोजंदारी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेला नाही कर्मचाऱ्यांना केवळ सात ते आठ हजार रुपयेच मिळतात मात्र ते ही मिळत नसल्याने कर्मचारी कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे
नगरपरिषदेत ढक्कल गाडी खेचणाऱ्या महिला यांना गंभीर दुखापत झाल्यावर त्यांना कुठल्याही प्रकारे वैद्यकीय सुविधा मिळतं नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आज दिनांक 08 जुलै पासून सकाळ पाळी पासून काम बंद आंदोलन पुकारले सदर प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांनी कामगारांची भेट घेत आंदोलनात सहभाग घेतला
कामगारांनी चक्क तीन तास ठिय्या दिल्यानंतर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ जितेंद्र गादेवार यांनी नगरपरिषदेत भेट देत रेड्डी यांच्याशी चर्चा करून कामगारांच्या संपूर्ण पाच मागण्या मान्य केल्याने कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले याप्रसंगी काँग्रेस सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, अलीम शेख, विशाल मादर, देव भंडारी, दिपक पेंदोर, शहंशाह शेख, गजानन उमाटे,हरीश कांबळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते