Home Breaking News Beed dist @news • ईमारती अभावी १० वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा...

Beed dist @news • ईमारती अभावी १० वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा भरते लिंबाच्या झाडाखाली— • अंबेजोगाई तालुक्यातील चनई तांडा वस्तिशाळा–डॉ.गणेश ढवळे

43

Beed dist @news

• ईमारती अभावी १० वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा भरते लिंबाच्या झाडाखाली—

• अंबेजोगाई तालुक्यातील चनई तांडा वस्तिशाळा–डॉ.गणेश ढवळे

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

अंबेजोगाई शहरापासून ७ किलोमीटर अंतरावरील चनई ग्रामपंचायत अंतर्गत चनई तांडा येथील १०० जवळपास लोकसंख्या असलेल्या चनई तांडा याठिकाणी २०१४ पासुन जिल्हा परीषदेची प्राथमिक शाळा सुरू झाली.इयत्ता १ ले ५ वी पर्यंतचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असुन गेल्या १० वर्षांपासून शासनाच्या वेळकाढू धोरण आणि दफ्तर दिरंगाई मुळे शाळेला ईमारत न मिळाल्याने ही शाळा आजही लिंबाच्या झाडाखाली भरते. शाळेत नियुक्त दोन्ही शिक्षक तांड्यावर येतात.जमा झालेले विद्यार्थी झाडाखाली जाऊन उभे राहतात.प्रार्थना होते आणि अध्ययन सुद्धा त्याच ठिकाणी ना बेंच ना मुलांना शिकवण्यासाठी फळा,सडा टाकून साफसफाई केलेल्या जमिनीवर बसुन विद्यार्थी शिक्षण घेतात.दहा वर्षात शाळेला अनेक शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, राजकीय पुढाऱ्यांनी भेटी दिल्या मात्र शाळेच्या स्थिती बाबत कोणाच्याही संवेदना जागे झाल्याच्या दिसुन येत नाही. पावसाळ्यात चिखल होतो म्हणून वस्तीवरील लहु आडे यांनी स्वतः चे राहते घर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वापरासाठी दिलेले आहे. मात्र हि संवेदनशीलता लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गामध्ये दिसून येत नाही याचे वैषम्य वाटते.सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ डॉ.गणेश ढवळे यांनी चनई तांडा वस्ती शाळेसाठी किमान १ रूम बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येऊन बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बीड यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे .
पावसाळ्यात चिखलामुळे आडेच्या घरात शाळा भरते — आडे मध्ये दिसणारी संवेदनशीलता लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांमध्ये नाही—-
शाळेसाठी ईमारत नसल्याने लिंबाच्या झाडाखाली १० वर्षांपासून शाळा भरते.पावसाळ्यात मात्र चिखल होत असल्याने मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी लहु आडे यांनी आपले राहते घर उपलब्ध करून दिले असुन आम्ही दिवसभर शेतात राबण्यासाठी जातो.संध्याकाळी येतो.दिवसभर तुम्ही मुलांच्या शाळेसाठी घर वापरा म्हणत संवेदनशीलता दाखवली ती कौतुकास्पद आहे.हि संवेदना मात्र लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गात दिसुन येत नसल्याचे संतापजनक आहे .
लोकप्रतिनिधी आणि आधिका-यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची चिंता नाही —– डॉ.गणेश ढवळे
बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ११ तालुक्यातील ३४९ शाळांच्या ५९२ वर्गखोल्या अत्यंत धोकादायक असुन ४६९ शाळांमधील ८५६ वर्गखोल्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे.मात्र लोकप्रतिनिधी धार्मिक स्थळांसाठी कोट्यवधींचा निधी देताना ज्ञानमंदिरासाठी निधी उपलब्ध करून देण्यात निरूत्साही दिसून येत असुन जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागालाही याचे गांभीर्य दिसून येत नाही. हि अतिशय खेदाची बाब आहे .