Home Breaking News Chandrapur dist@news • घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 26 जून 2024 पासून महाराष्ट्रभर काम...

Chandrapur dist@news • घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 26 जून 2024 पासून महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन सुरूच ! • अद्याप शासनाने “त्यांच्या” मागण्यांची घेतली नाही दखल

176

Chandrapur dist@news
• घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे 26 जून 2024 पासून
महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन सुरूच !
• अद्याप शासनाने “त्यांच्या” मागण्यांची घेतली नाही दखल

चंद्रपूर -किरण घाटे

ग्रामीण गृहनिर्माण योजना ही शासनाची अत्यंत महत्वाची व लक्षवेधी योजना असून रात्रंदिवस राबून वेळेत काम करणाऱ्या जिल्हा स्तरीय प्रोग्रामर व तालुका स्तरीय ऑपरेटर तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. घरकुल योजना
-ग्रामीणच्या प्रोग्रामर व ऑपरेटर यांचे दि. 26 जून 2024 पासून मानधन वाढ इत्तर मागण्या पूर्ण करणेबाबत आंदोलन सुरू असून त्यांनी चंद्रपूर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले होते.
या शिवाय प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना देखील जिल्हास्तरीय प्रोग्रामर व ऑपरेटर यांनी त्यांच्या कामबंद आंदोलन बाबत निवेदन सादर केले आहे.
केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेचे संपूर्ण काम जिल्हा स्तर प्रोग्रामर व तालुका स्तर ऑपरेटर गेल्या कित्येक दिवसांपासून काम करीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना
जिल्हा प्रोग्रामर कु. दिपाली जवळे, जिल्हा ऑपरेटर कु. मीनाक्षी क्षीरसागर, तालुका ऑपरेटर कु. पल्लवी पराते, कु. दर्शना बुरडकर, नितीन वेलपुलवार, अंगद गुंडले, महेश शेळके, प्रकाश घडसे, स्वप्निल भगत, प्रणित बोबाटे, प्रफुल करपे, गौरव सोरते, राजेंद्र खोब्रागडे, सचिन भसारकर, सचिन बुरांडे, पंकज झुरे, राजकुमार बावणे आदिं कर्मचारी उपस्थित होते.या कामबंद आंदोलनात ते देखील कर्मचारी सहभागी झाले आहेत.