Home Breaking News Chandrapur dist@ news • जिवती व सावली तालुक्यातील बेघरांना मिळणार हक्कांचे घर!...

Chandrapur dist@ news • जिवती व सावली तालुक्यातील बेघरांना मिळणार हक्कांचे घर! • शेंकडों घरकुल धारकांचे होणार स्वप्न साकार ना.सुधीर मुनगंटीवारांचे प्रयत्न; महेश देवकतेंचा सातत्याने पाठपुरावा

116

Chandrapur dist@ news
• जिवती व सावली तालुक्यातील बेघरांना मिळणार हक्कांचे घर!
• शेंकडों घरकुल धारकांचे होणार स्वप्न साकार
ना.सुधीर मुनगंटीवारांचे प्रयत्न;
महेश देवकतेंचा सातत्याने पाठपुरावा

जिवती (चंद्रपूर) किरण घाटे –

चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिदुर्गम जिवती तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना आता शासनाच्या वतीने हक्कांचे घर मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे.या संदर्भात चंद्रपूर जिल्हा भाजयु मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा तडफदार युवा नेते महेश देवकते यांनी या संदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. अश्यातचं चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती व सावली तालुक्यातील बेघर लाभार्थ्यांना लवकरचं हक्काचं घर मिळावे यासाठी त्यांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्षात भेट घेत त्यांना एक लेखी निवेदन सादर केले आहे .ना.मुनगंटीवार यांनी देखील या निवेदनाचा विचार करत बेघर लाभार्थ्यांना घरकुल देण्याचे आश्वासन देवकते यांना दिले आहे.त्यामुळे लवकरचं उपरोक्त दोन्ही तालुक्यातील गरजूंना घरकुल मिळून त्यांचे घरकुलांचे स्वप्न साकार होणार आहे.
चंद्रपूर जिल्हयातील तब्बल 1136 घरकुलांना शासनांकडून आता मंजूरी मिळणार असून, त्यात घरकुलांसाठी पाञ असलेल्या जिवती तालुक्यातील 476 पाञ लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतून; तर 112 लाभार्थ्यांंना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (धनगर) योजनेतून घरकुल मंजूर होणार आहेत .या शिवाय सावली तालुक्यातील 548 लाभार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतून मंजूरी मिळणार आहे. तद्वतच याच तालुक्यातील 548 पाञ लाभार्थ्यांना घरकुल मिळावे यासाठी चंद्रपूर जि.प.चे माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार हे सतत प्रयत्न करीत आहे.
दरम्यान जिवती व सावली तालुक्यातील एकूण 1136 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर व्हावे, यासाठी मंञी ना .सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न केले असून, जिवती तालुक्यातील दोन्ही योजनेतून 588 घरकुलांना मंजूरी मिळावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांनी ना.सुधीर मुनगंटीवार यांचेकडे सतत पाठपुरावा केल्याने हे यश प्राप्त झाले आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेतून जिवती तालुक्यातील ग्रा.पं.केकेझरी-1, कुंबेझरी-59, कोदेपूर-18, टाटाकोहाड-2, चोपनगुडा-7, चिखली (खुर्द)-32, चिखली (बु.)-22, दमपूर मोहदा-34, धोंडाअर्जूनी-23, नंदप्पा-11, पाटण-9, पिट्टीगुडा नं.2-50, गुडशेला-55, आसापूर-45, सेवादासनगर-20, मरकलमेटा-14, लांबोरी-12, मरकागोंदी-7, सोरेकसा-30, टेकामांडवा-13, खडकी हिरापूर-12 तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (धनगर) घरकुल योजनेतंर्गत खडकी हिरापूर-14, गुडशेला-47, चिखली (खुर्द)-12, टेकामांडवा-22, धोंडाअर्जूनी-3, नंदप्पा-5, पाटण-1, पुडीयाल मोहदा-3, लांबोरी-2 व मरकागोंदी-3 घरकुल मंजूर होणार असल्याचे महेश देवकते यांनी सांगितले.