Home Breaking News Ballarpur city@ news • “द गुड पॉलिटीशियन” शिबिर करीता बल्लारपूर चे किसन...

Ballarpur city@ news • “द गुड पॉलिटीशियन” शिबिर करीता बल्लारपूर चे किसन केसकर यांची निवड

38

Ballarpur city@ news
• “द गुड पॉलिटीशियन” शिबिर करीता बल्लारपूर चे किसन केसकर यांची निवड

सुवर्ण भारत : शंकर महाकाली ( संपादक)

बल्लारपूर :- शहरातील सामाजिक कार्यकर्ते किसन केसकर यांची “द गुड पॉलिटीशियन” शिबिर करीता निवड झाली आहे.
द इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसी नवी दिल्ली द्वारे हैदराबाद आणि नवी दिल्ली येथे 20/07/2024 ते 21/07/2024 दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील “द गुड पॉलिटीशियन” दोन दिवसीय निवासी शिबिर आयोजित केले आहे. इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसी एनजीओ 5 कॉल आणि मुलाखतींद्वारे संपूर्ण भारतभर सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या आणि राजकारणी बनण्याची किंवा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे मूल्यांकन करते आणि त्यांची निवड करते.
गेल्या महिन्यात सुमारे २४८७ लोकांना कॉल केले होते, त्यापैकी ८५३ लोकांना भारतातील २९ राज्यांमधील (७ केंद्रशासित प्रदेश) लोकांकडून फीडबॅक आला होता. त्यापैकी ५७% लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही किंवा तांत्रिक कारणांमुळे संपर्क होऊ शकला नाही. ३० % अल्पसंख्याक समुदायातील लोकांनी अभिप्राय दिला आणि व्हिडिओ कॉल आणि गूगल मिट द्वारे त्यांचा पाठपुरावा केला गेला.
दि इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रसी एनजीओ संस्थेच्या अंतिम आणि पाचव्या टप्प्यासाठी दिल्ली आणि हैदराबाद येथे दोन दिवसीय शिबीरसाठी फक्त ५० लोकांची निवड करण्यात आली. त्या ५० लोकांमध्ये बल्लारपूर शहराचे किसन दिपचंद केसकर यांची निवड करण्यात आले.