Home Breaking News Varora taluka@ news • तहसीलच्या टॉवर वर चढून न्याय मिळविण्यासाठी अनोखे आंदोलन...

Varora taluka@ news • तहसीलच्या टॉवर वर चढून न्याय मिळविण्यासाठी अनोखे आंदोलन • पूर्वेश वांढरे चा कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी वैभव डहाणे यांचा प्रशासनाशी लढा

25

Varora taluka@ news
• तहसीलच्या टॉवर वर चढून न्याय मिळविण्यासाठी अनोखे आंदोलन
• पूर्वेश वांढरे चा कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी वैभव डहाणे यांचा प्रशासनाशी लढा

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : वरोरा शहरातील मालवीय वॉर्डात राहणाऱ्या वांढरे कुटुंबातील चार वर्षीय मुलाचा दूषित पाणी पिल्याने मृत्यू झाला होता असा आरोप मालवीय वॉर्डातील नागरिकांनी केला आहे. या घटनेला पंधरा दिवस उलटून सुद्धा न्याय मिळाला नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ता वैभव डहाणे यांनी व्यक्त केली आहे.त्यांनी मृतक बालकाचे कुटूंबियांना नगरपालिका पालिका प्रशासन न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्याबाबत वरोरा पोलीस प्रशासनाला 15 जुलै 2024 लाच लेखी कळविले होते असें कळते
मालवीय वार्डात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणा दुरुस्त करून नागरिकांना शुद्ध पाणी द्यावे. तसेच मृतक चार वर्षीय बालक पूर्वेश ला प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आंदोलकारी वैभव डहाणे यांनी केली. तसेच पाणीपुरवठा व्हाल लिकीज मुळे पाईप द्वारे दूषित पाणी नळाला येत होते. तॊ लिकीज नगरपालिका प्रशासनाने दखल घेऊन दुरुस्ती केला. परंतु काम करणाऱ्या दोषी ठेकेदारावर प्रशासनाने अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.19 जुलै 2024 ला सकाळी 6.00 ते 6.30 चे दरम्यान तहसील कार्यालय परिसरातील टॉवर वर चढून अनोखे आंदोलन सुरु केले. प्रशासनात एकच खळबळ उडाली.आंदोलनकारी वैभव डहाणे यांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु आंदोलन सुरूच राहिले.

घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, गजानन भोयर पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, सामाजिक व राजकीय नेते आणि आदी प्रशासन दाखल झाले.
आंदोलकारी वैभव डहाणे यांना टॉवर वरून खाली येण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले परंतु ठेकेदारावर सदोष मणुस्य वधाचा गुन्हा दाखल करावा यावर आंदोलनकारी अडला होता.

अखेर एस डी ओ.मॅडम कडे मिटिंग लावण्यात आली, या मिटिंग मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी सांगितले की सदर प्रकरणाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडे पाठविल्या जाईल.

चौकशी समिती नेमली

पाण्याचे सॅम्पल प्रयोग शाळेत 8 जुलैला पोहचले आहे. त्या सॅम्पल. चा रिपोर्ट यायचा आहे. तसेच चौकशी मध्ये जे दोषी आढळेल त्यांचेवर कारवाई केल्या जाईल, सर्व चौकशी पूर्ण व्हायला तीन दिवस लागतील “मुख्याधिकारी
गजानन भोयर”

…मृतक पूर्वेश च्या वडिलांची पोलिसात तक्रार
नगरपालिका मुख्याधिकारी प्रशासक आणि पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार देण्यात आली.

पूर्वेश च्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी तसेच पाणी पुरवठा करणारी कंपनीवर कारवाही झाली पाहिजे यासाठी उद्धव उबाठा शिवसेना चे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे, आणि रवी शिंदे यांनी आग्रही भूमिका मांडली.

तहसील कार्यालय परिसरात मालवीय वॉर्डातील नागरिक सुद्धा
निर्णय होत पर्यंत ठाण मांडून बसले होते.

#१४ तासानंतर आंदोलन मागे#