Home Breaking News Beed dist @news •स्वाराती रुग्णालयातील रुग्णाच्या विविध समस्या संदर्भात- •अंबाजोगाई...

Beed dist @news •स्वाराती रुग्णालयातील रुग्णाच्या विविध समस्या संदर्भात- •अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांचा उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण-

61

Beed dist @news

स्वाराती रुग्णालयातील रुग्णाच्या विविध समस्या संदर्भात-

अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांचा उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण-

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांची जीवन -संजीवनी मानली जाते !मात्र येथे मागील काही महिण्यापासून रुग्णाचे हेळसांड होत असून , रुग्णांची प्रचंड लूट केली जाते . अति दक्षता वार्डात जाण्यापूर्वी देवासमोर काही कर्मचारी पैसे ठेवायले सांगतात , तर डिस्चार्ज होताना कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतात . या ठिकाणी अद्यावत ब्लड बँक असताना सुद्धा शहरातील बाहेरच्या लॅब वाल्याकडे रक्त तपासणी साठी पाठवले जाते विशेषत: त्यांनी सांगितलेल्या लॅब मध्येच जावे लागते , किंबहुना इतर लॅब चा रिपोर्ट आणला तर ते पाहतही नाहीत , परिणामी रुग्णांना आर्थिक लुटिचा सामना सहन करावाच लागतोय ?
ठराविक औषध वगळता बहुतांश गोळया /औषधे बाहेरच्या मेडिकल वरून घ्यावी लागतात , दवाखाना चे प्रधानमंत्री जनऔषधी मेडिकल हे या ठिकाण चे फक्त नावालाच असून औषध विक्री मात्र इतर मेडिकल च्या भावाने होत असून इथेही रुग्णांची लूट होत आहे . त्याच बरोबर येथील शासकीय सेवेत असणारे डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस बंद कराव्यात , स्वाराती रुग्णालयातील रुग्णांची होणारी हेळसांड व लूट थांबविण्याकरता अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे हे दिनांक 22 जुलै 2024 रोजी सोमवारपासून अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे .
या बाबत प्रशासन आता अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांच्या आंदोलनाची दखल घेते की नाही? आणि जर दखल घेतली तर, काय कारवाई करणार ? या कडे अंबाजोगाई येथील सर्व स्तरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे .