Home Breaking News Gadchiroli dist@ News •शासनाच्या विविध योजना नागरिकांना पोहचवा! •दिरंगाई, कामचुकार कर्मचाऱ्यांची...

Gadchiroli dist@ News •शासनाच्या विविध योजना नागरिकांना पोहचवा! •दिरंगाई, कामचुकार कर्मचाऱ्यांची गय करणार नाही •मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांची एटापल्लीत आढावा बैठक

43

Gadchiroli dist@ News
•शासनाच्या विविध योजना नागरिकांना पोहचवा!

•दिरंगाई, कामचुकार कर्मचाऱ्यांची गय करणार नाही

•मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांची एटापल्लीत आढावा बैठक

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

एटापल्ली:- राज्य शासनाच्या विविध योजना लोकाभिमुख असून त्या योजना व सोयी, सवलत्या नागरिकांना पोहचवा. हयगय, हलगर्जीपणा, दिरंगाई, कामचुकार करणारे अधिकारी व कर्मचारी यांची गय केली जाणार नाही असे सूचना वजा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी आढावा बैठकीत दिले.
स्थानिक तहसील कार्यालयात शुक्रवार 19 जुलै रोजी विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक घेऊन विकासात्मक कामांचा मागोवा घेतले. जी कामे रखडत आहे त्या सबंधित अधिकारी व कर्मचारी यांना खडे बोल सुनावले.
आढावा बैठकीत अध्यक्षस्थानी मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम होते. तर मंचावर उपविभागीय अधिकारी आदित्य जिवणे, एसडीपोओ चैतन कदम, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (महिला व बालकल्याण)राजेंद्र भुयार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, संवर्ग विकास अधिकारी आदिनाथ आंधळे, एटापल्ली नगर पंचायतीचे मुख्याधिकारी प्रवीण चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, प्रदेश सरचिटणीस युनूस शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी रस्ते, वीज, सिंचन, शिक्षण, कृषी, आरोग्य, वन जमिनीचे पट्टे, पोषण आहार या व अन्य विविध योजनेचे ‘मागोवा’ घेऊन दिरंगाई व थंडबस्त्यात असणारे कामा विषयी कडक शब्दात सबंधित अधिकारी व कर्मचारी यांना ताशेरे ओढले व सुनावले तर प्रगती पथावर सुरू असणारे कामांचे समाधान व्यक्त केले.
तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी अधिकारी , कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी कटाक्षाने लक्ष घालावे असे म्हणत विकासात्मक कामांवर अधिक भर दिले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील विविध गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.