Home Breaking News Chandrapur dist@ News •पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चीचपल्ली गावात पाऊसाचा महापूर,...

Chandrapur dist@ News •पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चीचपल्ली गावात पाऊसाचा महापूर, काँग्रेस नेते राजू झोडे

64

Chandrapur dist@ News
•पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चीचपल्ली गावात पाऊसाचा महापूर, काँग्रेस नेते राजू झोडे

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून चंद्रपूर तालुक्यातील व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या चीचपल्ली गावात तलाव फुटून व मामा तलाव फुटून जवळपास350 घर पुरामुळे बाधित झाले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा प्रशासन आणि महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गौतम निमगडे यांचे क्षेत्र असलेल्या गावातच ही परिस्थिती उद्भवली असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून जिल्हा प्रशासनतर्फे अद्याप कुठलीही मदत न मिळाल्याने काँग्रेस नेते राजू झोडे यांनी पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले व तेथील पूरपीडितांशी संवाद साधला.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मतदारसंघ असलेल्या चीचपल्ली गावात रविवारी रात्री च्या सुमारास गाव तलाव व मामा तलाव फुटला.यामुळे जवळपास 350हुन आधीक घर पाण्याखाली गेली तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर चीचपल्ली गावात राहणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गौतम नीमगडे यांना साधी कल्पना सुद्धा नसणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ मदतकार्य पोहोचवून स्थानिकांना आर्थिक मदत करावी व तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी काँग्रेस नेते राजू झोडे यांनी केली आहे.याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांना याबाबत लवकरच भेटून पत्र देण्यात येईल असेही झोडे यांनी म्हटले आहे.