Home Breaking News Ghugus city@ News • लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि लॉयड्स ईनफीनाइट फाउंडेशन...

Ghugus city@ News • लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि लॉयड्स ईनफीनाइट फाउंडेशन तर्फे दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण संपन्न •तीन शाळांतील 28 शिक्षकांनी घेतला सहभाग

150

Ghugus city@ News
• लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि लॉयड्स ईनफीनाइट फाउंडेशन तर्फे दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण संपन्न

•तीन शाळांतील 28 शिक्षकांनी घेतला सहभाग

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

Ghugus : लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि लॉयड्स ईनफीनाइट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर मध्ये चालणाऱ्या आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत
प्रियदर्शनी कन्या विद्यालय घुग्घुस,
न्यू इंग्लिश हाय स्कुल पांढरकवडा,
व इंदिरा गांधी विद्यालय पडोली
या तीन शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच शाळेच्या भौतिक सुविधांची पूर्तता यांवर अविरत कार्य केल्या जात आहे. याचाच एक भाग म्हणून शिक्षकांसाठी २५ व २६ जुलैला प्रियदर्शिनी कन्या विद्यालय घुग्घुस येथे दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन केल्या गेले. प्रशिक्षणाला तिन्ही शाळांतील २८ शिक्षकांनी सहभाग घेतला. प्रशिक्षक म्हणून लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या प्रकल्प व्यवस्थापिका कांचन थोरवे मॅडम आणि समन्वयिका सारिका राऊत मॅडम यांची उपस्थिती लाभली.

सदर प्रशिक्षणामध्ये व्यक्तीसाह्यकार्य, समुपदेशन आणि वर्गासाठी ध्येय निश्चिती इ. विषयांवर सखोल मार्गदर्शन केल्या गेले. प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांना विषयासंदर्भात अधिक स्पष्टता यावी यासाठी केवळ मार्गदर्शन न करता विविध उपक्रमांचा वापर करण्यात आला. यात गटचर्चा, गट सादरीकरण, मुलाखत, नाटिका, आत्मपरीक्षण या पद्धतींचा वापर केल्या गेला. हे प्रशिक्षण अतिशय उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. सदर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आनंदो शाळा सक्षमीकरण कार्यक्रम, चंद्रपूर झोन चे समन्वयक मुकेश भोयर आणि सहाय्यक समन्वयक रश्मी होले, साक्षी काळे, सुमय्या मिर्झा , प्रज्ञा पवार, मिलिंद कातकर यांनी कठीण परिश्रम घेतले.