Home Breaking News Chandrapur city@ News •महाकाली कॉलरी पुलावरून वाहत्या पाण्यात कार टाकणे पडले महागात

Chandrapur city@ News •महाकाली कॉलरी पुलावरून वाहत्या पाण्यात कार टाकणे पडले महागात

676

Chandrapur city@ News
•महाकाली कॉलरी पुलावरून वाहत्या पाण्यात कार टाकणे पडले महागात

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर : सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी- नाल्यांचा प्रवाह वाढला आहे. छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे. चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी कडे जाणाऱ्या स्मशान घाट जवळील पुलावरून कार वाहून गेल्याची घटना आज उघडकीस आली. कारमधील लोक थोडक्यात वाचल्याचे सांगण्यात येत आहे.

माहितीनुसार, पाच दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातून वाहणारी झरपट नदी दुथडी भरून वाहत आहे. वेकोलि महाकाली कॉलरी कडे जाणाऱ्या स्मशान घाट जवळील झरपट नदीच्या छोट्या पुलावरून पाणी वाहत आहे. आज सकाळी एका कार चालकाने पाण्याच्या प्रवाहामुळे पुल ओलांडण्याचा प्रयत्न केला.

मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गाडी पुलावरून वाहू लागली. वाहनातील दोघांनीही सतर्क राहून आपले प्राण वाचवले. मात्र कार पाण्याच्या प्रवाहात वाहत राहिली.

घटनास्थळी उपस्थित लोकांकडून सांगण्यात येत आहे की, कारमध्ये दोन जण होते, त्यापैकी एकाने धोका पाहून खाली उतरले आणि दुसऱ्याने झाडाला लटकून आपला जीव वाचवला. सदर घटनेचे व्हिडिओ वायरल होत असून ज्यामध्ये कार पाण्यात वाहत आहे.