Home Breaking News ⬜🌀गंध ⬜🌀 🏵️🌀मुक्ता आगडे pk सहज सुचलं काव्यकुंज सदस्य मूल, चंद्रपूर

⬜🌀गंध ⬜🌀 🏵️🌀मुक्ता आगडे pk सहज सुचलं काव्यकुंज सदस्य मूल, चंद्रपूर

163

⬜🌀गंध ⬜🌀

🏵️🌀मुक्ता आगडे pk सहज सुचलं काव्यकुंज सदस्य मूल, चंद्रपूर

सुवर्ण भारत: किरण घाटे

🔲💠सांजवेळी कुजबुज पडली कानी पारव्याची !
हळूच झुळूक अंग स्पर्शून गेली गारव्याची !!

अलगद नभातुनी बरसु लागल्या भुईवर सरी !
मुखावर माझ्या हर्ष लाट अन धडधड पेटली उरी !!

सुटले मन मोकाट ना कुठलाही मनाला बांध !
फुलपाखरासंगे उडत आला तुझ्या आठवणींचा गंध !!

आठवणींच्या हिंदोळ्यावर मन उंच उंच झोके घेई !
तुझ्या गंधात बांधूनी मज विशाल गगनात नेई !!